• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • फॉरमॅट करून नव्याकोऱ्या रुपात विकायचे महागडे चोरीचे मोबाइल, मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

फॉरमॅट करून नव्याकोऱ्या रुपात विकायचे महागडे चोरीचे मोबाइल, मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने (Mumbai Police Crime Branch) चोरीचे महागडे मोबाइल विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.

  • Share this:
मुंबई, 06 मार्च: कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा (Coronavirus Lockdown) फायदा घेत, लोकांच्या असायतेचा फायदा घेत विविध प्रकारच्या गुन्ह्याच्या घटना गेल्या काही काळापासून वाढल्या आहेत. चोरीच्या घटना देखील आजकाल वाढल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने (Mumbai Police Crime Branch) देखील चोरीचे मोबाइल विकणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून 9 लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. विविध राज्यांतून महागडे चोरीचे मोबाइल विकल्याप्रकरणी मुंबई क्राइम ब्रँच युनिट 12 ने 3 आरोपींना अटक केली आहे. या तिघांवर असा आरोप आहे की ते महागडे चोरीच्या मोबाइलमधला डेटा सॉफ्टवेअरच्या मदतीने पूर्णपणे डिलीट करायचे. अर्थात हे भामटे चोरीच्या अँड्राइड फोनच्या क्लाउडवरील डेटा किंवा इतर डेटा तसंच आयफोनमधील आयक्लाउड अकाउंट डिलीट करून हे हँडसेट पुन्हा बाजारात विकायचे. गुन्हे शाखा युनिट 12 ने सुमारे 9 लाख रुपये किंमतीचे 70  मोबाइल हस्तगत  केले आहेत. असिफ अब्दुल दोढिया (वय 35 वर्षे), रईस राहित खलियानी (वय 23 वर्षे), तारिफ जहांगिर (वय 31 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. दहिसर पूर्व येथे राहणारे शैलेश बिचकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे शाखा युनिट 12 च्या अधिकाऱ्यांनी मोबाइल चोर टोळीचा शोध सुरू केला. क्राईम ब्रांचला मिळालेल्या माहितीनुसार, डार्क वेस्ट बोनी प्लाझा शॉपिंग सेंटरच्या दुकान क्रमांक 23 मध्ये चोरीला गेलेल्या मोबाइलमधील डेटा, क्लाउड अकाउंट आणि आयफोनचे आयक्लाउड अकाउंट डिलीट केले जात. त्यासाठी दोन जण 2 मार्चला चोरीचे मोबाइल घेऊन याठिकाणी येणार असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. (हे वाचा-22 लाख रोकड असलेलं ATM चोरट्यांनी केलं गायब; पोलिसांच्या शेजारीच घडला हा प्रकार) पोलिसांनी दुकानावर नजर ठेवायला सुरुवात केली. दोघे दुकानात पोहोचताच गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांसह दुकानदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एका विविध कंपनीचे 70 मोबाइल, हार्डडिस्क, एक  उच्च दर्जाचं सॉफ्टवेअर आणि सिमकार्ड  आणि काही रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या टोळीत असणाऱ्या इतर राज्यातील भामट्यांचा शोध पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published: