मुंबई, 11 मार्च : मुंबईतल्या (Mumbai) दक्षिण मुंबई इथं स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी (Mahindra Scorpio) प्रकरणी एनआयएला (NIA) मोठे यश मिळाले आहे. स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क करून पांढरा रंगांच्या इनोव्हा गाडीतून दोन संशयित फरार झाले होते. त्या इनोव्हा गाडी (Innova car) संदर्भात एनआयएच्या टीमच्या हाती मोठी माहिती हाती लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडी बाबत मोठा खुलासा करणार असल्याचं सांगितलं जातं आहे.
स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी महत्वाचा दुवा मानला जात आहे. कारण संशयित या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीत बसून मुंबईबाहेर फरार झाले होते. तेव्हापासून मुंबई पोलीस या पांढऱ्या रंगांच्या गाडीचा गाडीचा शोध घेत होती. मुंबई ठाणे,पुणे, नाशिक या भागातील सर्व हायवेवरील सीसीटीव्ही फुटेज हॉटेल्समधील सीसीटीव्ही फुटेज पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज आणि टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलीस तपास होते.
IPS अधिकाऱ्यानं सेक्स रॅकेटमध्ये अडकवले'सुसाइड नोटमध्ये तरुणाचा आरोप!
ही कार मायकल रोडवर स्कॉर्पिओ गाडी पार्क करून स्कॉर्पिओ गाडीतील ड्रायव्हरनंतर पांढरा रंगाच्या इनोव्हा गाडीत बसून निघून गेला. या पांढऱ्या रंगांच्या इनोव्हा गाडीचे मुलुंड टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. एवढंच नाही तर मुंबई क्राईम ब्रांच न केलेला तपासनुसार, घटनेच्या रात्री स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी कार मायकल रोडवर पार्क करण्यात आली. त्या रात्री ठाण्याहून मुंबईच्या दिशेने स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सोबतच मुंबईत आल्या होत्या.
मुंबईतल्या प्रियदर्शनी पार्क येथे या दोन्ही गाड्या काही थांबल्याचे देखील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यानंतर पुढे या दोन्ही गाड्या मुंबईतल्या कार मायकल रोडवर आल्या आणि त्यापैकी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी कार मायकल रोडवर पार्क करण्यात आली होती त्यानंतर स्कॉर्पिओ गाडीतील चालक हा ड्रायव्हर सीटवरून मागच्या सीटवर उडी मारून हळूच गाडीचा मागचा दरवाजा उघडून वाकून रोडच्या पलीकडे गेला आणि तिथे आधी आधीच उभी असलेल्या इनोव्हा गाडीतून स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडीचा चालक फरार झाला होता.
धारावीच्या कोरोना उद्रेकात लढा देणारा अधिकारी हरपला, रमेश नांगरे यांचं निधन
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडी बाबत महत्त्वाचे धागेदोरे हातात लागली असतील तर लवकरच स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा छडा लावण्यात मोठे यश मिळेल आणि या सर्व मागे कोण काम करत होतं ? कोणाचा हात होता? या कटामागे कोण होतं? या कटाचा नेमका उद्देश काय होता? या सर्वचा उलगडा या पांढऱ्या इनोव्हा गाडीमुळे होणार आहे. त्यामुळे एनआयए ला पांढरऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडी बाबत मिळालेली माहिती या तपासात मोठा तुलाच मानला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.