मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'IPS अधिकाऱ्यानं सेक्स रॅकेटमध्ये अडकवले'सुसाइड नोटमध्ये तरुणाचा आरोप, रेल्वेखाली दिला जीव

'IPS अधिकाऱ्यानं सेक्स रॅकेटमध्ये अडकवले'सुसाइड नोटमध्ये तरुणाचा आरोप, रेल्वेखाली दिला जीव

 कपडे वाळू घालत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या आठव्या मजल्यावरून खाली कोसळल्या.

कपडे वाळू घालत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या आठव्या मजल्यावरून खाली कोसळल्या.

'महिला IPS अधिकाऱ्याने आपलं आयुष्य उद्धवस्त केले. आपल्याला खोट्या सेक्स रॅकेटमध्ये ( Fake Sex Racket) अडकवले, असा आरोप करत एका 26 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे.

  • Published by:  News18 Desk

लखनऊ, 11 मार्च :  एका तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या (Suicide) केल्याच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या तरुणाची सुसाइड नोट (Suicide Note) घटनास्थळी सापडली आहे. यामध्ये त्याने 'महिला IPS अधिकाऱ्याने आपलं आयुष्य उद्धवस्त केले. आपल्याला खोट्या सेक्स रॅकेटमध्ये ( Fake Sex Racket) अडकवले,'असा आरोप केला आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्याला कठोर शिक्षा देण्याची इच्छा देखील त्याने व्यक्त केली आहे. पोलीस प्रशासनाने मात्र आपल्या अधिकाऱ्याचा बचाव केला असून अधिकाऱ्याला क्लीन चीट (clean chit)  दिली आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊ (Lucknow) मधील हा सर्व प्रकार आहे. येथील सचिवालयात काम करणाऱ्या विशाल सैनी या 26 वर्षांच्या तरुणाने रेल्वे क्रॉसिंगवर धावत्या रेल्वेच्या खाली उडी मारुन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृत विशालकडून एक सुसाइड नोट जप्त केली. ही नोट पाहताच पोलिसांच्या पायाखालील जमीन सरकली.

मृत विशाल सैनीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये आयपीएस अधिकारी प्राची सिंह (IPS Prachi Singh) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 'माझ्या आत्महत्येला आयपीएस अधिकारी प्राची सिंह जबाबदार आहेत. त्यांनी माझे करियर खराब केले आहे. मी समाजात आणि कुटुंबीयांसमोर उभं राहू शकत नाही, याचा मला त्रास होत आहे. प्राची सिंह यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. पदोन्नतीच्यावेळी अनेक निरापराध लोकांना शिक्षा केली. त्यांनीच मला सेक्स रॅकेटमध्ये फसवले.' असा गंभीर आरोप विशालने केला आहे.

प्राची सिंह यांनी 13 फेब्रुवारी रोजी लखनऊमधील एका ब्युटी सलून आणि स्पा सेंटरवर धाड टाकली होती. त्यावेळी केलेल्या कारवाईत पाच महिलांसह विशालला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आपला छळ झाल्याचा दावा विशालने केला आहे.

( 'झोमॅटो डिलिव्हरी बॉयने नाक फोडलं' रक्तबंबाळ अवस्थेत महिलेचा आरोप Viral Video )

पोलिसांनी फेटाळले आरोप

दरम्यान, मृत विशाल सैनी याने केलेले सर्व आरोप लखनऊ पोलिसांनी फेटाळले आहेत. पोलिसांच्या टीमने नियमानुसार कारवाई केली होती. या प्रकरणात विशाल सैनीला झालेली अटक ते त्याची आत्महत्या या संपूर्ण घटनाक्रमात त्याच्या घरच्यांनी पोलिसांच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, असे लखनऊ पोलिसाांनी या विषयावर प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हंटले आहे.

First published:

Tags: Crime news, Fake sex racket, IPS Officer, Suicide, Uttar pradesh