मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

धारावीच्या कोरोना उद्रेकात लढा देणारा अधिकारी हरपला, रमेश नांगरे यांचं निधन

धारावीच्या कोरोना उद्रेकात लढा देणारा अधिकारी हरपला, रमेश नांगरे यांचं निधन

 स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचा कोरोना काळात धारावीमध्ये केलेल्या त्यांच्या कामाबद्दल सत्कार केला होता.

स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचा कोरोना काळात धारावीमध्ये केलेल्या त्यांच्या कामाबद्दल सत्कार केला होता.

स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचा कोरोना काळात धारावीमध्ये केलेल्या त्यांच्या कामाबद्दल सत्कार केला होता.

मुंबई, 11 मार्च : मुंबईमध्ये (Mumbai) मागील वर्षी कोरोनाचा (Corona) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. आशिया खंडातील सर्वात मोठ्या अशा धारावीत (Dharavi) कोरोनाने शिरकाव केला होता. या काळात कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी रमेश नांगरे (Assistant Commissioner of Police Ramesh Nangare) यांचं निधन झालं आहे.

कोरोना काळात सगळ्यात मोठा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावीमध्ये कोरोनाचा फैलाव झाला होता. त्यावेळी तत्कालीन धारावी पोलीस स्टेशनचे निरीक्षक आणि सहायक पोलीस आयुक्त रमेश नांगरे यांनी चोख कर्तव्य पार पार पाडले होते. धारावीमध्ये रमेश नांगरे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कोरोनाच्या काळात नांगरे यांनी अतुलनीय काम केले होते. स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचा कोरोना काळात धारावीमध्ये केलेल्या त्यांच्या कामाबद्दल सत्कार केला होता. जागतिक पातळीवर धारावी पॅटर्नची नोंद घेण्यात आली होती. रमेश नांगरे यांना अनेक सन्मानाने सन्मानित करण्यात आहे होते.

हे स्मार्ट हेल्मेट घातल्याशिवाय बाईक स्टार्ट होणार नाही; पाहा भन्नाट VIDEO

रमेश नांगरे यांनी 2 दिवसांपूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. आज सकाळी ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे रमेश नांगरे यांचं निधन झालं. नांगरे यांच्या निधनामुळे पोलीस दलावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिला लॉकडाउन लागू करण्याचा इशारा

दरम्यान, राज्यात कोरोना धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लॉकडाउनचा इशारा दिला आहे.

'कोरोनाचा धोका वाढत आहे, त्यामुळे ज्यांना ज्यांना कोरोनाची लस घेण्यासाठी पात्र ठरवले आहे, त्यांनी कोणतीही भीती न बाळगता लस घ्यावी. लस नोंदणीसाठी मध्ये गोंधळ निर्माण झाला होता पण आता अडचण दूर करण्यात आली आहे, लस सर्वांनी घ्यावी, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कदाचित काही ठिकाणी लॉकडाउन लागू करावा लागणार आहे. म्हणून माझी सर्व लोकांना विनंती आहे की, लसीकरण करून घ्या, अनावश्यक गर्दी करू नका, मास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करा, जर कुठे नियमांचे पालन केले जात नसेल तर काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन लावावा लागणार आहे, एक दोन दिवसांमध्ये बैठक घेणार आहोत, त्यानंतर लॉकडाउनचा कडक निर्णय घ्यावा लागणार आहे,  असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Corona, Corona hotspot, Death, Mumbai, मुंबई, मुंबई पोलीस