संतापजनक! मुल व्हावं म्हणून मित्राच्याच 3 वर्षांच्या मुलीला 7व्या मजल्यावरून फेकलं खाली

कुलाबा परिसरातील तीन वर्षांच्या चिमुकलीच्या हत्याकांड प्रकरणाला धक्कादायक वळण प्राप्त झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 10:24 AM IST

संतापजनक! मुल व्हावं म्हणून मित्राच्याच 3 वर्षांच्या मुलीला 7व्या मजल्यावरून फेकलं खाली

मुंबई, 9 सप्टेंबर : कुलाबा परिसरातील तीन वर्षीय चिमुकलीच्या हत्याकांड प्रकरणाला धक्कादायक वळण प्राप्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीनं अंधश्रद्धेच्या नादापायी निष्पाप चिमुकलीचा बळी दिला आहे. या घटनेमुळी परिसरात खळबळ उडाली आहे. दोन लहान मुलांची हत्या केल्यानंतर अपत्य प्राप्ती तसंच जीवनात प्रगती होईल, असे एका अज्ञात व्यक्तीनं आरोपी अनिल चुगानीला सांगितलं होतं. या अंधश्रद्धेतून आरोपीनं शेजारी राहणाऱ्या आपल्या मित्राच्याच जुळ्या मुलींना शनिवारी (7 सप्टेंबर)आपल्या घरी आणलं. सुरुवातीला त्यानं जुळ्यांपैकी तीन वर्षांच्या चिमुकलीला सातव्या मजल्यावरून खाली फेकलं. यानंतप स्वतःच्याच कृत्यानं आरोपी घाबरला. मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

(वाचा : नागपुरात 4 वर्षाच्या चिमुरड्यासह आईचा बत्त्याने ठेचून निर्घृण खून)

मुंबईतील कुलाबा परिसरात अंगावर काटा आणणारी ही घटना घडली आहे. आरोपीनं शेजाऱ्याच्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला सातव्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना शनिवारी समोर आली. या घटनेत त्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. चिड आणणारी ही घटना शनिवारी (7 सप्टेंबर) रात्री उशिरा घडली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

(वाचा : दहावीच्या विद्यार्थिनीला पळवून नेऊन नराधमाने चार मित्रांच्या मदतीने केले दुष्कृत्य)

कुलाबा येथील रेडिओ क्लबजवळच्या अशोका टॉवर इमारतीतील ही घटना आहे. आरोपीविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...

(वाचा : मुलगी झाली हो! कुटुंबात 55 वर्षांनंतर जन्मलेल्या 'ती'चं जल्लोषात केलं स्वागत)

VIDEO: मुसळधार पावसात जीव वाचवण्यासाठी अजगराची धडपड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 10:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...