नागपुरात 4 वर्षाच्या चिमुरड्यासह आईचा बत्त्याने ठेचून निर्घृण खून

नागपुरात 4 वर्षाच्या चिमुरड्यासह आईचा बत्त्याने ठेचून निर्घृण खून

4 वर्षाच्या चिमुरड्यासह आईचा बत्त्याने ठेचून निर्घृण खून झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

नागपूर, 8 सप्टेंबर: 4 वर्षाच्या चिमुरड्यासह आईचा बत्त्याने ठेचून निर्घृण खून झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील स्वामी विवेकानंद चौकात ही घटना घडली आहे. प्रियांका दिनेश शाहू (25) आणि अंशुल दिनेश शाहू (4) अशी खून झालेल्या मायलेकांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, मूळ बिहारचे असलेले दिनेश शाहू हे पत्नी प्रियांका आणि मुलगा अंशुल यांच्यासह नरखेड येथील स्वामी विवेकानंद चौकात नारायण वानखेडे यांच्या घरात भाड्याने राहत होते. दिनेश यांच्या घरी गणपती असूनही अंधार कसा दिसतोय. यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता प्रियांका आणि अंशुल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले तर जवळच रक्ताने माखलेला बत्ताही आढळून आला. दरम्यान, मागील 15 दिवसांपासून मूळ बिहारचा असलेला रवी नावाचा तरुण त्यांच्यासोबत राहायला आला होता. रवी बेपत्ता असल्यामुळे त्यानेच हे हत्याकांड केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पतीचीही चौकशी...

पत्नी आणि मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पती दिनेश यांचीही चौकशी सुरु आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, नागपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाणे वाढले आहे. यातच आता नागपुरात मायलेकाचा बत्त्याने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

VIDEO:मल्हारी लाहिरे या लष्करी जवानावर अंत्यसंस्कार, 2 वर्षाच्या मुलाने दिला मुखाग्नी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2019 07:53 PM IST

ताज्या बातम्या