दहावीच्या विद्यार्थिनीला पळवून नेऊन नराधमाने चार मित्रांच्या मदतीने केले दुष्कृत्य

दहावीच्या विद्यार्थिनीला पळवून नेऊन नराधमाने चार मित्रांच्या मदतीने केले दुष्कृत्य

नराधमाने त्याच्या चार मित्रांच्या मदतीने हे दुष्कृत्य केल्याचे पीडितेने सांगितले. पीडितेच्या अंगावर गंभीर जखमा आहेत.

  • Share this:

बीड, 6 सप्टेंबर: दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने पळवून नेऊन तिच्या बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने बीड शहर हादरले आहे. 'तुझे वडील कोणत्या रस्त्याने येतात मला माहीत आहे. त्यांना संपवून टाकीन', अशी धमकीही नराधमाने पीडितेला दिली होती. या घटनेमुळे शाळेत गेलेल्या मुली सुरक्षित आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे तर शहरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

चार मित्रांच्या मदतीने नराधमाने केले दुष्कृत्य..

मिळालेली माहिती अशी की, नराधमाने त्याच्या चार मित्रांच्या मदतीने हे दुष्कृत्य केल्याचे पीडितेने सांगितले. पीडितेच्या अंगावर गंभीर जखमा आहेत. तिने सांगितलेल्या आपबितीने पोलीस देखील हैराण झाले आहेत. पीडिता शाळेत जाताना आरोपी तिची कायम छेड काढत होता. यामुळे वडिलांनी तिचे दुसऱ्या शाळेत अॅडमिशन घेतले. तरीही आरोपीने तिचा पिछा सोडला नाही. 'तू माझ्याशी बोलत जा.. मला भेटत जा... अन्यथा तुझ्या भावाला किडनॅप करेन, तुझे वडील कोणत्या रस्त्याने येतात हे मला माहीत आहे. त्यांना संपवून टाकीन, अशा धमकीही आरोपीने पीडितेला दिली होती. दोन दिवसांपूर्वी पीडित मुलगी शाळेत गेली असता आरोपीने तिला धमकावले. तेव्हा आरोपीचे चार मित्र उपस्थित होते. पीडितेला बळजबरीने दुचाकीवर बसवून निर्जण रस्त्याने एका बंगल्यात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच पीडितेला बेदम मारहाण केली. पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीच्या मित्रांनी तिला नातेवाईकांकडे सोडले आणि तिथून फरार झाले.

या प्रकरणात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीही अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. लहान वयात तरुणाई गंभीर गुन्ह्याकडे वळत आहे. हे अत्यंत गंभीर आहे.

VIDEO : किल्ल्यांच्या निर्णयावर संभाजीराजे नाराज, मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2019 08:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading