नोएडा, 20 ऑगस्ट : उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या एका मॅनेजर महिलेने आत्महत्या केली. ही घटना नोएडाच्या सेक्टर 100 येथील आहे. मृत महिलेचे नाव अंजली कौशिक असे आहे. तिचे वय 28 होते. तसेच आपल्या पती आणि सासरच्या लोकांसोबत होती. अंजली ही मूळची हरियाणाच्या सोनीपत येथील रहिवासी होती. अंजली नोएडा येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होती. शुक्रवारी तिचा मृतदेह घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सासरच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली त्यांच्यासोबत घरी होती. विश्रांती घेते, असे सांगून ती खोलीत गेली. मात्र, बराच वेळ ती बाहेर न आल्याने सासरच्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीतून पाहिलं तर त्यांना मोठा धक्का बसला. त्याठिकाणी अंजलीचा मृतदेह फासावर लटकलेला होता. यानंतर सासरच्यांनी तत्काळ पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला. यानंतर त्यांनी मृतदेह खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. सासरच्यांनी सांगितले की, 4 वर्षांपूर्वी अंजलीने दीपकसोबत प्रेमविवाह केला होता. अंजलीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे अंजली तिच्या पालकांच्या संपर्कात नव्हती. तसेच त्यांचाही तिच्याशी संपर्क नव्हता. यामुळे ती खूप नाराज असायची. हेही वाचा - सोशल मीडियावर मैत्री, Love Marriage च्या 3 महिन्यानंतर पत्नीचं मोठं कांड, पती हैराण सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी केली जात आहे. अंजलीच्या पतीचीही चौकशी सुरू आहे. प्रेमविवाहाच्या चार वर्षांनंतर अंजलीने आत्महत्या केली आहे. एका मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर पदावर काम करणाऱ्या एका सुशिक्षित तरुणीने आत्महत्या का केली, याचे उत्तर अजून मिळालेले नाही. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र, या घटनेने खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.