मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सोशल मीडियावर मैत्री, Love Marriage च्या 3 महिन्यानंतर पत्नीचं मोठं कांड, पती हैराण

सोशल मीडियावर मैत्री, Love Marriage च्या 3 महिन्यानंतर पत्नीचं मोठं कांड, पती हैराण

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सिंघानिया आणि त्यांची पत्नी रुची या दोघांनी तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता.

  • Published by:  News18 Desk

इंदूर, 20 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील इंदूरमधील लासुदिया परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील डाळ व्यापारी सिंघानिया यांनी आपल्या पत्नीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सिंघानिया यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या पत्नीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

नेमकं काय घडलं -

सिंघानिया आणि त्यांची पत्नी रुची या दोघांनी तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. दोघांची सोशल मीडियावर मैत्री झाली होती. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर दोघेही परदेशी दौऱ्यावर गेले होते. परदेशात असताना दोघांमध्ये काही वाद झाला होता. मात्र अलीकडेच त्याची पत्नी रुची कोणालाही न सांगता घरातून बेपत्ता झाली आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे लाखो रुपयांचे दागिनेही घरातून गायब झाले आहेत. त्यामुळे पती सिंघानिया हे हैराण झाले आहेत.

शहरातील अत्यंत पॉश भागात असलेल्या शांती निकेतनमध्ये राहणाऱ्या नितेश सिंघानियाचा काही काळापूर्वी उत्तर प्रदेशातील रुचीशी ऑनलाइन संपर्क झाला होता. दोघांचे आधीच लग्न झाले होते. पण नात्यातील मतभेदांमुळे दोघांनीही जोडीदारापासून घटस्फोट घेतला. त्यांच्या ऑनलाईन मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर दोघेही सुखात राहत होते. काही काळानंतर दोघेही युरोप दौऱ्यावर गेले. युरोप दौऱ्यादरम्यान दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. मात्र, हा वाद मिटला असे नितेशला वाटत होते.

हेही वाचा - पत्नीचे विवाहबाह्य संबंध, पतीने समजूतही काढली, पण...तरुणाने उचललं भयानक पाऊल

मात्र, इंदूरला आल्यानंतर काही दिवसांनी रुची अचानक गायब झाली. याबाबत नितेश यांना समजल्यावर त्यांनी तिच्याशी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुचीच्या बाजूने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी तर तिने फोन घेणेही बंद केले. दरम्यान, व्यापारी सिंघानिया यांनी घरातील दागिन्यांची झडती घेतली असता तेही घरातून गायब असल्याचे आढळून आले आहे. या दागिन्यांची किंमत अंदाजे 50 लाख आहे. या घटनेने नितेश सिंघानिया यांना धक्काच बसला आहे. यानंतर नितेशने लासुडिया पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Love story, Madhya pradesh