मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

6 वर्षांपासून 'तो' एका खोलीत होता बंद; करायचा 'हे' संतापजनक काम; वाचून वाटेल आश्चर्य

6 वर्षांपासून 'तो' एका खोलीत होता बंद; करायचा 'हे' संतापजनक काम; वाचून वाटेल आश्चर्य

जतिन भारद्वाज यानं  तब्बल सहा वर्ष स्वत: च्या घरात कैदेत ठेवललं होतं

जतिन भारद्वाज यानं तब्बल सहा वर्ष स्वत: च्या घरात कैदेत ठेवललं होतं

जतिन भारद्वाज यानं तब्बल सहा वर्ष स्वत: च्या घरात कैदेत ठेवललं होतं

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 25 जुलै: गुन्हेगार गुन्हा (Crime News) करण्यासाठी कधी आणि कोणत्या थराला जाईल काहीच सांगता येत नाही. अशाच एका नराधमानं केलेलं कृत्य समोर आलं आहे. दिलशाद गार्डन येथील जतिन भारद्वाज यानं  तब्बल सहा वर्ष स्वत: च्या घरात कैदेत ठेवललं होतं. तो फक्त त्याच्या वाढदिवशी वर्षामध्ये एकदा स्नान करायचा. तो सहा वर्षांपासून आपल्या वडिलांशी बोलला नाही. तो फक्त त्याच्या आईबरोबर खाण्यापिण्याशी संबंधित होता. मात्र या सर्वांच्या दरम्यानही मुलींना ब्लॅकमेल (Blackmailing) करण्याचा विचित्र मार्ग त्याला सापडला.

आश्चर्य म्हणजे या ब्लॅकमेलिंग व्यवसायात पैसे हडपण्याचा (Money looting) त्याचा हेतू नव्हता. त्याऐवजी मुलींचे आक्षेपार्ह फोटो मागण्याची आणि ते आपल्या मोबाइलमध्ये ठेवण्याचं त्याला व्यसन होतं. यासाठी त्यानं नैराश्य, तणाव आणि दारिद्र्य ग्रस्त असणाऱ्यांसाठी टॉक लाइफ या अ‍ॅपची मदत घेतली.

हे वाचा - क्रिकेट खेळताना घडलं अघटित; दोन तरुणांचा मॅचदरम्यान मृत्यू, कुटुंबाला बसला धक्का

अ‍ॅपच्या माध्यमातून तो प्रथम दक्षिण आशियातील पीडित मुलींशी संपर्क साधत असे. चर्चा जसजशी वाढत जात होती, तसतसे तो मुलींना दरमहा 200-300 डॉलर्सची मदत देण्याचे आश्वासन देत असे. त्या बदल्यात तो त्यांचे आक्षेपार्ह्य फोटो आणि व्हिडिओ मागत असे. जेव्हा मुली फोटो आणि व्हिडीओजच्या बदल्यात पैसे मागत असत, तेव्हा सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन तो त्यांचं तोंड बंद करत असे.

इंडोनेशियातील एका मुलीच्या तक्रारीवरून जीटीबी एन्क्लेव्ह पोलिस स्टेशनने आरोपी जतिन भारद्वाज (वय 21) यांना दिलशाद गार्डनमधून पकडले. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की त्याने आतापर्यंत या अॅपद्वारे 15 मुलींशी बोलला आहे आणि तिघांकडून फोटो आणि व्हिडीओ मागितले आहेत.

First published:

Tags: Crime news