Home /News /crime /

अल्पवयीन मुलींची प्रसूती आणि बाळांची बोली; डॉक्टरांनी रुग्णालयात भरवला नवजात बाळांचा बाजार

अल्पवयीन मुलींची प्रसूती आणि बाळांची बोली; डॉक्टरांनी रुग्णालयात भरवला नवजात बाळांचा बाजार

डॉक्टरांकडून सुरू असलेल्या या भयंकर रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

    इंदूर, 25 जुलै : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीची प्रसुती आणि नवजात बाळाच्या खरेदीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी अल्पवयीन तरुणीला अडीच लाख रुपये देऊन करार केला होता. पोलिसांनी या प्रकरणात शहरातील डॉ. सौरभ सोनी, स्त्री रोग विशेषज्ज्ञ डॉक्टर रेणू सोनी सह 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस डॉक्टर सौरभ सोनी याला ताब्यात घेऊन चौकशी करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 6 ते 7 दिवसांपूर्वी 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची या रुग्णालयात प्रसूती करण्यात आली होती. ती बाळाला जन्म देऊन रुग्णालयातच सोडून गेली. यानंतर रुग्णालयाने कर्मचारी कंचना बाई हिला 500 रुपये देऊन तिला दूध देण्यास सांगितलं. मात्र जेव्हा बाळाला मागितलं तेव्हा कर्मचारीने देण्यास नकार दिला. या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. हे ही वाचा-Stock Market संचालकाचं घृणास्पद कृत्य; तरुणीने पगार मागितला म्हणून केला बलात्कार पोलिसांनी दाखल केला गुन्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन प्रसुती आणि नवजात बाळाबाबत तक्रार आल्यानंतर 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये डॉ सौरभ सोनी, स्त्री रोग विशेषज्ज्ञ रेणु सोनी यांच्या व्यतिरिक्त रुग्णालयात काम करणारे कर्मचारी मोहसिन खान, जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी संजना पटेल, डॉ. सौरभ सोनी, कमलेश पटेल यांच्याविरोधात जुवेनाइल जस्टिस अॅक्ट आणि पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजात बाळासाठी अडीच लाखांची बोली लावण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात तपास केला जात आहे. ते म्हणाले की, या रुग्णालयातील काही डॉक्टर अल्पवयीन मुलीची अवैध रुपात प्रसूती करीत होत्या. आणि नवजात बाळांची विक्री केली जात होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या