• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • भयंकर! पहिल्या मजल्यावरून आईला दिला धक्का, डोकं फुटून झाला मृत्यू

भयंकर! पहिल्या मजल्यावरून आईला दिला धक्का, डोकं फुटून झाला मृत्यू

दारुच्या नशेत असणाऱ्या मुलाने आपल्या आईला पहिल्या मजल्यावरून धक्का दिल्यामुळे (son pushed mother from first floor and mother dies) तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 • Share this:
  जयपूर, 20 सप्टेंबर : दारुच्या नशेत असणाऱ्या मुलाने आपल्या आईला पहिल्या मजल्यावरून धक्का दिल्यामुळे (son pushed mother from first floor and mother dies) तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दारु पिऊन एक तरुण (Drunken) आपल्या पत्नीला मारहाण करत होता. सुनेला वाचवण्यासाठी (mother tried to save daughter in law) मध्यस्थी करायला गेलेल्या आईला मुलाने जोरदार धक्का दिल्यामुळे ती पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली कोसळली. डोकं आपटून तिचा जागीच मृत्यू झाला. असा घडली दुर्घटना राजस्थानमधील भरतपूर शहरात शेर सिंह आणि त्याची पत्नी रोमा राहतात. त्यांच्यासोबत त्यांची आई हुकमी यादेखील राहत होत्या. शेर सिंह याच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. शेर सिंहला काही वर्षांपासून दारूचं व्यसन होतं. रोज रात्री दारूच्या नशेत घरी येऊन तो शिवीगाळ आणि हाणामारी करत असे. आपल्या पत्नीशी भांडण करून तिला मारहाण करणाऱ्या शेर सिंहला आवरण्यासाठी त्याची आई पुढे गेली. मात्र नशेत असणाऱ्या शेरनं आपल्या आईला जोरदार धक्का दिला. आई पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून थेट खाली कोसळली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हुकमी यांना नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या घटनेनंतर शेर सिंह फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आपल्या सुनेला दररोज होणारी मारहाण हुकमी यांना सहन होत नव्हती. मात्र शेर सिंह याच्यापुढे दोघींचंही काही चालत नसे. आपल्या परीने सुनेला वाचवण्यासाठी धावून गेलेल्या हुकमी यांना या सगळ्यात आपली जीव गमावावा लागल्याबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हे वाचा -डोंगरावर फिरायला गेलेल्या दीराने केली भलतीच मागणी; नकार देताच वहिनीचा भयंकर शेवट शेर सिंहची पत्नी रोमाने आपल्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या आईच्या खुनाचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लवकरच शेर सिंहला अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
  Published by:desk news
  First published: