मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पैशांच्या लोभापायी आईनंच विकलं 5 वर्षांच्या लेकीला, सापडला चिमुकलीचा मृतदेह

पैशांच्या लोभापायी आईनंच विकलं 5 वर्षांच्या लेकीला, सापडला चिमुकलीचा मृतदेह

एका आईनं आपल्या पोटच्या लेकीचाच काही रुपयांसाठी सौदा केल्याची धक्कादायक आणि लाजीरवाणी घटना समोर आली आहे.

एका आईनं आपल्या पोटच्या लेकीचाच काही रुपयांसाठी सौदा केल्याची धक्कादायक आणि लाजीरवाणी घटना समोर आली आहे.

एका आईनं आपल्या पोटच्या लेकीचाच काही रुपयांसाठी सौदा केल्याची धक्कादायक आणि लाजीरवाणी घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

जॉर्जिया, 2 जानेवारी: काही रुपयांच्या (Money) लोभापायी एका आईनंच (Mother) आपल्या सख्ख्या मुलीला (Daughter) विकल्याची (Sold) धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ काही रुपयांची गरज पूर्ण करण्यासाठी एक महिलेनं तिच्याच मुलीला एका नराधमाला विकलं आणि त्यानंतर काही तासांतच त्याने तिचं लैंगिक शोषण करून तिला मारून टाकल्याचं पोलीस तपासात उघड झालं. या घटनेनं सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.

काय आहे प्रकरण?

जॉर्जियात राहणाऱ्या क्रिस्टी सिपल नावाच्या महिलेनं आपल्या 5 वर्षांच्या मुलीला काही पैशांसाठी एका गुन्हेगाराला विकलं. तो गुन्हेगार मुलीला एका निर्जन इमारतीत घेऊन गेला. तिच्यासोबत दुष्कृत्य करून त्याने तिचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह फेकून दिला. आपली मुलगी गायब झाल्याची तक्रार क्रिस्टीनं नोंदवली होती, मात्र या घटनेत तिचाच हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

क्रिस्टीच्या गयावया

आपलं आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम होतं. तिच्यासोबत आपण असं कसं करू शकतो, असा सवाल क्रिस्टीनं केला आहे. आपल्या पतीकडून आपल्याला बदनाम करण्यासाठी हा कट रचला जात असल्याचा दावा तिनं केला आहे. आपल्या पतीनं आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कारासाठीदेखील आपल्याला हजर राहू दिलं नाही. सर्वांच्या देखत त्याने आपल्याला हाकलून दिलं, असं तिनं म्हटलं आहे. जाणीवपूर्वक या हत्येचा दोष आपल्यावर टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा क्रिस्टीनं केला आहे.

हे वाचा- कामासाठी बोलावून आश्रम शाळेतील मुलीसोबत अधिक्षकाचं विकृत कृत्य; पालघरमधील घटना

पोलिसांनी आणले पुरावे

क्रिस्टीनंच आपल्या मुलीचा सौदा केल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अर्थात, अद्याप पोलिसांनी ते पुरावे सादर केलेले नाहीत. मुलीचं लोकेशन, क्रिस्टीचं लोकेशन, मुलीच्या पोस्टमॉर्टेममधून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे पुरावे आणि इतर काही गोष्टींच्या आधारे पोलिसांनी क्रिस्टीवरच प्रथम संशय येत असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: Crime, Daughter, Mother, Murder, Police