पालघर, 02 जानेवारी: पालघर (Palghar) जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील आसे याठिकाणी शिक्षकी पेक्षाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत शाळेच्या अधिक्षकानं घृणास्पद कृत्य (minor girl of ashram school sexually molest) केलं आहे. नराधम आरोपीनं पीडित मुलीला घरकाम करण्यासाठी घरी बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न (Attempt to rape) केला आहे. एवढंच नव्हे तर संबंधित प्रकार कोणालाही सांगितला तर तुझ्या घरच्यांना जीवे मारेल, (Threat to death) अशी धमकीही आरोपीनं पीडित मुलीला दिली आहे. या प्रकरणी शाळेतील महिला शिक्षिकेनं मोखाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर शाळेच्या अधिक्षकाला अटक (Accused arrested) करण्यात आली आहे. योगेश अमरसिंग चव्हाण असं अटक केलेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास मोखाडा पोलीस करत आहेत. हेही वाचा- आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनी आढळली मृतावस्थेत; नाशकातील खळबळजनक घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही आसे येथील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेची विद्यार्थिनी आहे. याठिकाणी ती इयत्ता सातवीच्या वर्गात निवासी शिक्षण घेते. तर आरोपी योगेश चव्हाण हा निवासी वसतिगृहाचा अधीक्षक म्हणून नोकरी करतो. दरम्यान, 14 डिसेंबर रोजी आरोपीनं घरातील भांडी घासायची असल्याचं सांगून पीडित मुलीला आपल्या घरी बोलावलं होतं. पीडित मुलीनं घरातील भांडी धुतल्यानंतर, फरशी पुसून घेत होती. यावेळी आरोपी अधिक्षक याठिकाणी आला, त्याने पीडितेला पाठिमागून आवळून पकडलं. तुझं कोणावर प्रेम आहे का? म्हणत तो पीडितेच्या अंगाला झटू लागला. हेही वाचा- क्लासला आलेल्या अल्पवयीन मुलीला बनवलं वासनेचं शिकार; शिक्षकाचं धक्कादायक कृत्य एवढंच नव्हे तर आरोपीनं पीडितेला उचलून आपल्या बेडरूममध्ये घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं पीडित मुलीच्या प्रायव्हेंट अंगाला स्पर्श करत तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना ठार मारेल, अशी धमकी आरोपीनं दिली. दरम्यान शाळेतील एका महिला कर्मचाऱ्याने संबंधित सर्व प्रकार पाहिला आणि याची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर अधिक्षकाचा कांड उघडकीस आला आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.