मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Pune News: एका क्षणात उध्वस्त झालं 10 वर्षाच्या चिमुरडीचं आयुष्य! झोपेतून उठल्यावर समोर दिसले आई-भावाचे मृतदेह

Pune News: एका क्षणात उध्वस्त झालं 10 वर्षाच्या चिमुरडीचं आयुष्य! झोपेतून उठल्यावर समोर दिसले आई-भावाचे मृतदेह

Crime in Pune: दौंड तालुक्यातील पाटस याठिकाणी एका महिलेचा आणि तिच्या सात वर्षांच्या मुलाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची (mother and son dead body found in hanging state) घटना घडली आहे. नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. (फीचर फोटो- सांकेतिक)

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

दौंड, 28 एप्रिल: दौंड तालुक्यातील पाटस याठिकाणी एका महिलेचा आणि तिच्या सात वर्षांच्या मुलाचा  गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं (mother and son dead body found) एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेनं आत्महत्या केली की काही घातपात घडला आहे? याची कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आली नसून मृत महिलेच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय (murder) व्यक्त केला आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.

संबंधित घटना 27 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. 35 वर्षीय मृत महिलेचं नाव लिना सचिन सोनवणे असून सात वर्षांच्या मृत मुलाचं नाव ओम सचिन सोनवणे असं आहे. मृत महिला लिना सोनवणे आपली दहा वर्षांची मुलगी वैष्णवी आणि सात वर्षांचा मृत मुलगा ओमसोबत पाटसमधील एका अपार्टमेंटमध्ये राहते. मंगळवारी सकाळी वैष्णवी झोपेतून उठली असता, तिचा भाऊ ओमचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती देण्यासाठी तिने आपल्या आईकडे धाव घेतली तर, आईचा मृतदेहही किचनमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

हे वाचा- पूजा हत्याकांड प्रकरणात मोठा ट्विस्ट! पोलीस अधिकारी पती आणि दीरच निघाले खुनी

यानंतर दहा वर्षाच्या वैष्णवीनं या घटनेची माहिती फोन करून आपल्या नातेवाईकांना दिली. यानंतर नातेवाईकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. त्यानंतर त्यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. संबंधित महिलेनं आपल्या मुलाची हत्या करून स्वतः गळफास घेतल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला आहे. तर नातेवाईकांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या याबाबतची कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही.

हे वाचा-आईच्या मृतदेहाशेजारी 2 दिवस उपाशी पडून होतं बाळ, वर्दीतील आईपणाला फुटला पाझर

या घटनेची माहिती देताना यवत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी सांगितलं की, 'घटनेची माहिती मिळानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल. त्यानंतर तपासाची दिशा ठरवून पुढील कारवाई केली जाईल.'

First published:

Tags: Crime news, Death, Mother, Pune, Son