मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अंडा करीसाठी आईचा जीवच घेतला; आधी डोकं भिंतीवर आपटलं नंतर रॉडने संपवलं

अंडा करीसाठी आईचा जीवच घेतला; आधी डोकं भिंतीवर आपटलं नंतर रॉडने संपवलं

कारण ऐकून अनेकांना धक्का बसला.

कारण ऐकून अनेकांना धक्का बसला.

कारण ऐकून अनेकांना धक्का बसला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

ओडिसा, 9 ऑक्टोबर : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या वृद्ध आईची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. कारण ऐकून अनेकांना धक्का बसला. आईने अंडा करी बनवण्यास नकार दिल्याने मुलाने वृद्ध आईची हत्या केली. ही घटना ओडिसातील गंजाममधील आहे. 50 वर्षीय त्रिबेनी नाइक दसऱ्यानिमित्ताने आपल्या मुलाकडे आली होती. मुलगा दारू पिऊन घरी परतला आणि त्याने आईकडे अंडाकरी बनवण्यास सांगितलं. मात्र आईने नकार दिल्यास मुलाने तिचं डोकं भिंतीवर आपटलं.

ओरडाओरडा करून शेजारीही आले आणि मुलाचा संताप पाहून कोणीच त्याला अडवू शकले नाही. यानंतर मुलाने आईवर लोखंड्याच्या रॉडने हल्ला केला. ज्यात महिलेला जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

औरंगाबादमध्ये विकृतीचा कळस, लुटमार करुन वृद्धेवर बलात्कार, नंतर पोलिसांवर हल्ला

मुलाला वैतागून सोडलं होतं घर...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिबेनी काही वर्षांपासून मुलापासून वेगळं राहत होती. महिला आंध्र प्रदेशातील एका प्रॉन प्रोसेसिंग फॅक्टरीत काम करीत होती. सनातनची पत्नीदेखील रागाच्या भरात घर सोडून निघून गेली होती. दसऱ्याच्या दिवशी त्रिबेनी मुलाच्या घरी आली होती. शुक्रवारी सायंकाळी मुलाने आईला अंडा करी करण्यास सांगितलं. मात्र महिलेने यास नकार दिल्याने मुलाने आईची हत्या केली.

First published:

Tags: Crime news, Mother, Murder news