मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /धक्कादायक! मध्यरात्रीच 3 महिन्याच्या बाळाला घरातून पळवून नेत माकडाने केली हत्या

धक्कादायक! मध्यरात्रीच 3 महिन्याच्या बाळाला घरातून पळवून नेत माकडाने केली हत्या

शनिवारी रात्री उशिरा माकडाने घरातील खोलीमध्ये झोपलेल्या तीन महिन्यांच्या बाळाला पळवून नेलं. यानंतर घरातील लोकांनी बाळाचा शोध घेण्यास सुरुवात केली असता हे बाळ पाण्याच्या टाकीत आढळून आलं

लखनऊ 10 जानेवारी : हत्येच्या (Murder) अनेक घटना आजवर तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, यात बहुदा आरोपी हा एखादा माणूसच असतो. मात्र, आता एक अतिशय धक्कादायक आणि अजब घटना समोर आली आहे. या घटनेत चक्क एका माकडाने बाळाची हत्या केली आहे (Monkey Killed a Baby). ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये घडली आहे.

मोबाईल चोरणाऱ्यांना नडली शूरवीर तरुणी, 300 मीटर गेली फरफटत; चोरट्यांना फुटला घाम

बागपतमध्ये शनिवारी रात्री उशिरा माकडाने घरातील खोलीमध्ये झोपलेल्या तीन महिन्यांच्या बाळाला पळवून नेलं. यानंतर घरातील लोकांनी बाळाचा शोध घेण्यास सुरुवात केली असता हे बाळ पाण्याच्या टाकीत आढळून आलं. यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी या बाळाला मृत घोषित केलं. या घटनेनं कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गढी काळंजरी या गावातील एका घरात तीन महिन्यांचा केशव खाटेवर झोपला होता. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घरात शिरलेल्या एका माकडाने त्याला पळवून नेलं. यानंतर बराच वेळ कुटुंबीयांनी बाळाचा शोध घेतला असता त्यांना केशव पाण्याच्या टाकीत आढळून आला.

एकच परिसर, एकच दिवस, एकच वेळ! एकाच कारच्या चोरीमुळे मालक हैराण

केशवला पाण्याच्या टाकीत पाहून कुटुंबीयांना धक्का बसला. लगेचच त्याा दिल्लीतील एका रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी या बाळाला मृत घोषित केलं. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांनी अनेकदा तक्रार करूनही याठिकाणची माकडे पकडली जात असल्यानं आता लोकांनी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे 3 महिन्यांच्या केशवला आपला जीव गमवावा लागला आहे.

First published:
top videos

    Tags: Baby died, Murder news