Home /News /crime /

मोबाईल चोरणाऱ्यांना नडली शूरवीर तरुणी, 300 मीटर गेली फरफटत; चोरट्यांना फुटला घाम

मोबाईल चोरणाऱ्यांना नडली शूरवीर तरुणी, 300 मीटर गेली फरफटत; चोरट्यांना फुटला घाम

चोरट्यांनी मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर तिने बाईक पकडून ठेवली आणि चोरट्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी 300 मीटर फरफटत जाऊन तिच्या गुडघ्यांना जखमा झाल्या, मात्र चोरटे चांगलेच घाबरले.

    गाझियाबाद, 9 जानेवारी: रस्त्यावरून जात असताना चोरट्यांनी (Thieves) अचानक हातातला मोबाईल (Mobile) हिसकावून (Snatched) घेतल्यानंतर त्यांच्याशी संघर्ष (Fight) करणाऱ्या तरुणीची (Young student) सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. नेहमीप्रमाणे घरी चाललेल्या तरुणीच्या पाठिमागून दोन चोरटे बाईकवरून आले आणि त्यांनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल काढून घेताच बाईकवरील मागच्या चोराला तिने पकडले आणि अजिबात सोडले नाही.  अशी घडली घटना दिल्लीतील गाझियाबादमध्ये बीएला शिकणारी निशा नावाची तरुणी क्लासवरून घरी चालली होती. त्यावेळी बाईकवरून आलेल्या दोघांनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि बाईकवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चपळाई दाखवत तिने बाईकवर बसलेल्या मागच्या तरुणाला पकडले आणि दुसऱ्या हाताने बाईक पकडत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. हे पाहून तरुणांनी बाईकचा वेग वाढवला आणि तरुणीला धावणं अवघड होऊ लागलं. तरीही धीर न सोडता तरुणी त्यांच्यामागून धावू लागली. एका क्षणी तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. मात्र तरीही तिने बाईक सोडली नाही आणि बाईकसोबत ती फरफटत गेली.  पोलीस ठाण्यात तक्रार हा प्रकार पाहून चोरटे चांगलेच घाबरले आणि स्वतःची तिच्या ताब्यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू लागले. काही अंतरानंतर तरुणीचा हात सुटला आणि चोरटे पळून गेले. त्यानंतर  तरुणीनं पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घटना घडली ते ठिकाण आपल्या हद्दीत येत नसल्याचं सांगत पोलीस तिला घटनास्थळी घेऊन गेले आणि दुसऱ्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला.  हे वाचा - तरुणीवर उपचार सुरू तरुणीनं जिंदल मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावेळी पोलिसांनी तिच्यासोबत घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला आणि तिला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या तरुणीच्या दोन्ही गुडघ्यांना जबर जखमा झाल्या असून इतर अनेक ठिकाणी तिला खरचटलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Mobile, Student

    पुढील बातम्या