नवी दिल्ली, 9 जानेवारी: एकाच दिवशी (Same day), एकाच वेळी (Same Time) एकाच कारची (Same car) चोरी (Stolen) झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ज्या कारची एकदा चोरी झाली होती, ती कार पोलिसांनी शोधून काढली (Found out) आणि मालकिणीकडे (Owner) सुपूर्द केली. त्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा हा सिलसिला जसाच्या तसा घडला आणि साधारण त्याच दिवशी, त्याच वेळेला पुन्हा एकदा चोरट्यांनी तीच कार लंपास केली.
अशी घडली घटना
दिल्लीतील मुखर्जी नगर परिसरात राहणाऱ्या आरती खन्ना यांची कार दोनदा चोरीला गेल्याचं दिसून आलं आहे. केवळ दुसऱ्यांदा चोरी होणं, यात फारसं विशेष नसलं तरी पहिली चोरी ज्या वेळी झाली, त्याच वेळी दुसरी चोरी होणं, हे विशेष असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आपलीच कार वारंवार चोरटे का पळवून नेत असावेत, असा प्रश्न त्यांना पडला असून त्याचं कुठलंच समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे सध्या तरी हा निव्वळ योगायोग असावा, असं त्यांना वाटत आहे.

आरती खन्ना आणि त्यांची कार
गेल्या वर्षीही झाली चोरी
10 जानेवारी 2021 या दिवशी आरती शर्मा यांच्या कारची चोरी झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं होतं. त्यांनी ज्या भागात त्यांची कार पार्क केली होती, तिथं एक गाडी आली. गाडी थांबली. त्यातून एकजण उतरला आणि आरती यांच्या कारमध्ये त्यानं दरवाजा तोडून प्रवेश केला. काही वेळातच बाहेरून आलेली कार आणि त्यामागून आरती यांची कार जाताना दिसली. यंदादेखील नेमकं असंच घडलं. यावेळी 9 जानेवारी 2022 या दिवशी आरती शर्मा यांच्या कारची पुन्हा एकदा चोरी झाली. गेल्या वर्षी चोरी झाली होती पहाटे 2 वाजून 59 मिनिटांनी, यंदा चोरी झाली ती पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी.
हे वाचा -
पोलीस तपास सुरू
आरती यांची कार त्याच वेळी दुसऱ्यांदा चोरण्यामागे चोरट्यांचा काही विशिष्ट हेतू आहे की हा निव्वळ योगायोग आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. लवकरच गुन्हेगारांना पकडलं जाईल आणि चौकशीतून सत्य काय ते बाहेर येईल, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.