अजित मांढरे, प्रतिनिधी मुंबई, 09 जून : अवघ्या देशाला हादरावून सोडणाऱ्या मिरा रोड हत्याकांड प्रकरणी नव-नवीन माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणी सोसायटीत राहणाऱ्या शेजाऱ्यांचा आरोपी मनोज सानेवर संशय होता. त्याची वागणूकही संशयास्पद होती अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या प्रेयसीच्या शरीराचे तुकडे करुन कुकरमध्ये शिजवून पुरावे नष्ट करणाऱ्या मनोज सानेबाबत आणि हत्या झालेली महिला सरस्वती वैद्य या दोघांच्या वागणुकीवर आणि सोसायटीतील वावर याबाबत मनोज सानेचा शेजा-यांना पहिल्यापासूनच संशय होता.
मनोज नेहमी चेहरा लपवून चेहऱ्यांवर मास्क लावूनच घराबाहेर पडायचा. तर, सोसायटीतील कार्यक्रमांना मनोज आणि सरस्वतीने कधीच हजेरी लावली नाही. एवढंच काय तर मनोजच्या शेजारी राहणाऱ्या विवेक यांनी त्यांच्या मुलाच्या बर्थ-डे पार्टीचे निमंत्रण द्यायला गेले होते, तेव्हा मनोजने विवेक यांच्याशी बोलणे टाळले. एवढचं काय तर मनोज याचे वागणे आम्हाला नेहमी संशयास्पद वाटत होते, असा खुलासा देखील मनोजच्या शेजाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मनोज साने हा बोरिवलीतील बाभई नाका येथील साने रेसिडेन्सीमध्ये राहत होता. संपूर्ण निवासस्थानाचा फ्लॅट क्रमांक 702 मागील 3 वर्षांपासून भाड्याने देण्यात आला आहे. याप्रकरणी येथे मोलमजुरी करणाऱ्या महिलेने याबाबत माहिती दिली. (Mira Road Murder : मिरा रोड हत्याकांडाचं नगर कनेक्शन, सरस्वती वैद्यबद्दल नवी माहिती समोर) मनोज साने यांच्या फ्लॅट क्रमांक 702 मध्ये राहणाऱ्या भाडेकरू महिलेने सांगितले की, आम्ही 3 वर्षांपासून म्हणजे 2020 पासून भाड्याने राहत आहोत. तेव्हा संवाद व्हायचा. करार झाला की भेटायचो. हा करार एकाच वेळी 2 वर्षांसाठी होता. तेव्हा भेटायचो आणि मग आगाऊ चेक द्यायचे. तो आमच्याशी मृदू बोलत होता. तो खूप कमी बोलत असे आणि तसेच याठिकाणी तो खूप कमी येत असे, त्यामुळे जास्त संवाद होत नसे. तो भाड्याने राहतो हेही आम्हाला माहीत नव्हते. त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही. तसेच तो फारसा कोणाशी बोलत नसे. तसेच आम्ही त्याला भाडे अॅडव्हॉन्स मध्ये द्यायचो. त्याच्याशी शेवटचे बोलणे 30 तारखेला झाले. तसेच येथील वॉचमननेही माहिती दिली. त्याने सांगितले की, मी 2 वर्षांपासून काम करत आहे. मध्येच गावी गेलो होतो. गावातून येऊन महिना झाला. याआधी आणखी एक चौकीदार होता. इथे येण्याचा प्रश्नच नाही. त्यांना कधी पाहिले नाही, असेही या वॉचमनने सांगितले.