मुंबई, 10 जून, अजित मनधरे: बोरीवलीमधून नुकतीच एक मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आरोपी मनोज साने याने आपल्याच लिव इन रिलेशनशिप पार्टनर सरस्वती वैद्यची निघृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे करून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न देखील केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मृतदेहाचे तुकडे करून ते प्रेशर कुकरमध्ये टाकायचा. ते शिजवल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचा. त्यानंतर तो हे तुकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आई, वडील विभक्त सरस्वती वैद्य या मुळ छत्रपती संभाजीनगरच्या राहणाऱ्या होत्या. त्यांची आई वारली, वडील आईपासून वेगळे राहात होते. सरस्वती यांना एकूण चार बहिणी होत्या. सरस्वती या वैद्य कुटुंबातील पाचवं अपत्य होत्या. आई वारली, वडील वेगळ राहत असल्यामुळे या सर्व बहिणी वेगवेगळ्या आश्रमात वाढलल्या, तिथेच शिकल्या. सरस्वती यांचं दहावीपर्यंत शिक्षण झालं होतं. सरस्वती या 18 वर्षांपर्यंत त्यांच्या बहिणीच्या घरी राहिल्या. त्यानंतर त्यांनी कामधंद्यासाठी मुंबई गाठली. मुंबई आल्यानंतर आरोपीची ओळख याच दरम्यान त्यांची ओळख आरोपी मनोज साने याच्याशी झाली. त्यांच्यामध्ये जवळीक वाढली. नंतर ते दोघे बोरीवलीमधील एक फ्लॅटमध्ये राहू लागले. नंतर दोघांनी लग्नाचाही विचार केला. त्यांनी एका मंदिरात जावून लग्नही केलं. मात्र काही कारणांमुळे त्यांच्यामध्ये वाद झाले, आणि या वादातूनच मनोज साने याने सरस्वती वैद्य यांची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.