मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

BREAKING : बारामतीत हायस्कुलमध्ये मुलीला घ्यायला गेलेल्या वडिलावर अल्पवयीन मुलांचा हल्ला, पालकाचा मृत्यू

BREAKING : बारामतीत हायस्कुलमध्ये मुलीला घ्यायला गेलेल्या वडिलावर अल्पवयीन मुलांचा हल्ला, पालकाचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

बारामती शहरातील कविवर्य मोरोपंत हायस्कूलमध्ये मुलीला न्यायला आलेल्या वडिलांवर खुनी हल्ला झाला.

पुणे, 18 ऑगस्ट : बारामतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक व्यक्ती शाळेत गेलेल्या आपल्या मुलीला शाळा सुटल्यानंतर घरी घेवून जाण्यासाठी शाळा परिसरात गेली होती. पण या व्यक्तीवर काही अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. अल्पवयीन मुलांनी धारदार शस्त्रांनी संबंधित व्यक्तीवर जोरजोरात वार केले. या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलांनी पूर्ववैमन्सातून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बारामती शहरातील कविवर्य मोरोपंत हायस्कूलमध्ये मुलीला न्यायला आलेल्या वडिलांवर खुनी हल्ला झाला. आरोपींनी मुलीच्या वडिलांवर धारदार शस्त्रांनी केले वार. हल्ला करणारे मुले हे अल्पवयीन आहेत. या हल्ल्यामध्ये वडील शशिकांत कारंडे यांचा जागीच मृत्यू. श्रीराम नगर कवी मोरोपंत हायस्कूल समोर संबंधित घटना घडली. (पश्चिम बंगालच्या रहिवाशाचा महाराष्ट्रात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, गोंदियात खळबळ, नागरिकांमध्ये दहशत) बारामती शहरातील त्रिमूर्ती नगर येथे राहणारे 54 वर्षीय शशिकांत कारंडे हे आज सायंकाळी सव्वा पाच ते साडेपाचच्या दरम्यान शहरातील कविवर्य मोरोपंत हायस्कूल येथे मुलीला आणावयास गेले असताना बाहेर थांबलेल्या तीन युवकांनी धारदार शस्त्रांनी डोक्यात, मानेवर वार केल्याने ते जागेवरच कोसळले. शशिकांत कारंडे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असताना डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. यापूर्वी देखील याच मुलांनी शशिकांत कारंडे यांच्या मुलावर वार केले होते. त्यानंतर आज शाळेसमोरच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलं हल्ला करुन फरार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शशिकांत यांना रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जातोय.
First published:

Tags: Crime, Murder

पुढील बातम्या