रवी सपाटे, गोंदिया, 18 ऑगस्ट : गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 58 वर्षीय इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. मृतक व्यक्तीचा मृतदेह हा अर्धनग्न अवस्थेत होता. त्यामुळे नेमकं काय घडलंय? हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे मृतक व्यक्ती ही गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी नाही. तसेच संबंधित व्यक्ती ही महाराष्ट्रातील नाही. या व्यक्तीकडे मिळालेल्या कागदपत्रांनुसार संबंधित व्यक्ती ही पश्चिम बंगालची रहिवासी आहे. या व्यक्तीने गोंदिया जिल्ह्यात येवून अर्धनग्न अवस्थेत आत्महत्या केली की त्या व्यक्तीसोबत घातपात झाला? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
गोंदिया शहरातील रिंग रोड येथे संबंधित घटना समोर आली आहे. रिंग रोड परिसरातील शेत शिवारात मृतक व्यक्तीचा संशयास्पद झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. शहरातील काही स्थानिकांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यानंतर अवघ्या काही क्षणात वाऱ्यासारखी ही बातमी संपूर्ण शहरात पसरली. त्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली.
(पुण्यात हैदोस, नाशिक जेलमध्ये आणल्यानंतर गुन्हेगारांचा थयथयाट, पोलिसावर जीवघेणा हल्ला, भयानक राडा)
संबंधित घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतक व्यक्तीला झाडावरुन खाली उतरवलं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं.
पोलिसांनी मृतक व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्याजवळ कोविड वॅक्सिनेशन कार्ड आढळलं. त्यातून मृतक व्यक्तीची ओळख पटली. संबंधित व्यक्तीच बसन सिते असं नाव असून ते 58 वर्षांचे होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच बसन सिते हे पश्चिम बंगालचे रहिवासी होते, अशी देखील माहिती समोर आली. पोलिसांना या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Maharashtra News