• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • अल्पवयीन मुलाने केली आई, वडील, बहीण आणि कुत्र्यांचीही हत्या; अखेर आत्महत्या करून संपवलं जीवन

अल्पवयीन मुलाने केली आई, वडील, बहीण आणि कुत्र्यांचीही हत्या; अखेर आत्महत्या करून संपवलं जीवन

एका अल्पवयीन मुलाने आपले आई, वडील आणि (Minor killed his family and pets) बहिणीची हत्या केली.

 • Share this:
  टेक्सास, 21 सप्टेंबर : एका अल्पवयीन मुलाने आपले आई, वडील आणि (Minor killed his family and pets) बहिणीची हत्या केली. त्यानंतर घरातील दोन पाळीव कुत्र्यांनाही त्याने गोळ्या घालून ठार केले. या सर्वांची हत्या केल्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडली आणि (Boy killed himself after killing family) आपलं आयुष्य संपवलं. या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. आईच्या वाढदिवशी केल्या हत्या अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या 15 वर्षांच्या मुलाने आपल्या पूर्ण कुटुंबाला संपवल्याची बातमी ‘मिरर युके’नं दिली आहे. या मुलानं त्याची आई जाना कोलबर्नला तिच्या वाढदिवशीच गोळ्या घातल्या. त्यानंतर वडील विलियम कोलबर्न यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार केलं. मग 13 वर्षांची बहीण एम्मालाही त्याने गोळीबार करून संपवलं. तिथेच असणाऱ्या घरातील दोन पाळीव कुत्र्यांनादेखील त्याने गोळ्या घातल्या आणि त्यांचा बळी घेतला. मृतदेहांचे फोटो सोशल मीडियावर सर्वांची हत्या केल्यानंतर या मुलाने त्यांचे फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर अपलोड केले. यानंतर शाळेतही आपण असाच प्रकार करणार असल्याचं त्यानं जाहीर केलं. या घटनेनं टेक्सासमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीनं या मुलाच्या घरचा पत्ता शोधला आणि त्याच्या घराला घेराव घातला. बंदुक खाली ठेऊन बाहेर येण्याचं आवाहन पोलिसांनी त्याला केलं. मात्र तेवढ्यात आतून गोळी झाडल्याचा आवाज आला आणि सर्व काही शांत झालं. या मुलाने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याचं पोलिसांना दिसलं. हे वाचा - बापरे! हॉटेलमधील बर्गरमध्ये होता विंचू, पहिला घास खाताच तरुण हॉस्पिटलमध्ये दाखल पोलिसांनी सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. या मुलाने सर्वांची हत्या का केली, यामागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. या कुटुंबाच्या नातेवाईकांना या घटनेमुळे जबर धक्का बसला असून मुलगा असे काही करेल, याची अपेक्षाही केली नव्हती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
  Published by:desk news
  First published: