मराठी बातम्या /बातम्या /देश /बापरे! हॉटेलमधील बर्गरमध्ये होता विंचू, पहिला घास खाताच तरुण हॉस्पिटलमध्ये दाखल

बापरे! हॉटेलमधील बर्गरमध्ये होता विंचू, पहिला घास खाताच तरुण हॉस्पिटलमध्ये दाखल

हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या बर्गरमध्ये (Scorpion found inside burger in the hotel) विंचू असल्याची घटना नुकतीच उघडकीला आली आहे.

हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या बर्गरमध्ये (Scorpion found inside burger in the hotel) विंचू असल्याची घटना नुकतीच उघडकीला आली आहे.

हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या बर्गरमध्ये (Scorpion found inside burger in the hotel) विंचू असल्याची घटना नुकतीच उघडकीला आली आहे.

जयपूर, 21 सप्टेंबर : हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या बर्गरमध्ये (Scorpion found inside burger in the hotel) विंचू असल्याची घटना नुकतीच उघडकीला आली आहे. तरुणाने हा बर्गर खाताना पहिल्याच (Young boy bites scorpion) घासाला विंचू चावला. विचित्र चव लागल्याने त्याने घास तोंडातून बाहेर काढला. पाहतो तर काय? विंचूचा अर्धा भाग त्यात होता. मग त्याने बर्गर उघडून पाहिल्यावर त्यात मेलेला विंचू असल्याचं दिसून आलं.

अशी घडली घटना

जयपूरमधील एका सुप्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये 22 वर्षांचा तरुण सैनी नावाचा तरुण गेला होता. त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही होता. तरुणने काऊंटरवरून दोन बर्गर ऑर्डर केले. त्यातील एक बर्गर मित्राला दिला, तर दुसरा स्वतः घेतला. बर्गरचा पहिला घास खाताच त्याला तोंडात काहीतरी विचित्र गोष्ट आल्याचं जाणवलं. घास बाहेर काढल्यावर तो मेलेल्या विंचूचा भाग असल्याचं त्याला दिसलं. त्यानंतर दोघांनी हॉटेलच्या स्टाफला याची कल्पना दिली.

मॅनेजरकडून लपवाछपवी आणि अरेरावी

हॉटेल मॅनेजरच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने बर्गर उघडून त्यातील विंचू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या चुकीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न मॅनेजर करत असल्याचं पाहून तरुण आणि त्याच्या मित्रानं पोलिसांना बोलावून घेतलं. त्यावेळी हॉटेलच्या मॅनेजरने तरुण आणि त्याच्या मित्रावर दादागिरी करत त्यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हे वाचा - ड्रग्ज न मिळाल्याने 3 मुलींच्या बापाची आत्महत्या, डोक्यात झाडून घेतली गोळी

तरुणची तब्येत बिघडली

हा प्रकार सुरू असतानाच तरुणची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे हॉटेलमधील इतर ग्राहकांनादेखील जबर धक्का बसला. पोलिसांनी या बर्गरचे नमुने तपासणीसाठी पाठवून दिले आहेत. जयपूरमधील एका नामांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. रस्त्यावरचं अन्न खाऊ नका, असं सांगितलं जातं. मात्र अत्यंत प्रतिष्ठित आणि अलिशान हॉटेलमध्येदेखील हा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून हॉटेलवर काय कारवाई करण्यात येते, याकडं जयपूरवासियांचं लक्ष आहे.

First published:
top videos

    Tags: Health, Jaipur, Junk, Scorpio