हरदोई, 6 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील माधोगंज भागात एका महिलेने आपल्या सोबत घडलेल्या घटनेबाबत फेसबुकवरुन मुख्यमंत्र्यांचा कारवाईची मागणी केली आहे. तिने यासंदर्भात एक पोस्ट लिहिली त्यानंतर मात्र महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेने माधोगंज पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे. सध्या तरी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माधोगंज भागात निवारी रोली गुप्ता हिने रविवारी रात्री घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत महिलेच्या पतीने सांगिलं की, भागातीस एक लवी नावाचा तरुण तिला त्रास देत होता. घर सोडून दुसरीकडे राहायला गेले मृत महिलेचा पती मनोज याने सांगितलं की, लवीच्या कृत्यामुळे त्रस्त होऊन आम्ही ते घर सोडून दुसऱ्या भागात भाडे तत्वावर घर घेतलं होतं. ते पत्नी आणि मुलासह येथेच राहत होते. सांगितलं जात आहे की, शनिवारी ते घरातून दुकानात जाण्यासाठी निघाले होते. त्या दरम्यान लवी त्यांच्या घरी शिरला आणि 50 हजारांची कॅश आणि मोबाइल घेतला. याचा जेव्हा रोलीने विरोध केला तर लवीने रोलीला गुप्ताला पोलिस स्टेशनला बोलावलं. रोली आपल्या तीन मुलांसह स्टेशनवर जात होती. तेव्हा रस्त्यात बसलेल्या लवीने रोली गुप्ताला मारहाण सुरू केली. लवीने रोली गुप्ताचं नाक कापलं. ज्यानंतर ती बेशुद्ध झाली. याबाबत पतीला कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पतीने पोलिसांना सर्व घटना सांगितली. मात्र पोलिसांनी तक्रार लिहून घेतली नसल्याचं मृत महिलेच्या पतीने सांगितलं. हे ही वाचा-
भयावह! आईने मुलीच्या Love Storyचा असा केला End; 25 वर्षे सुरू होता जीवघेणा खेळ
पोलिसांनी तक्रार लिहून घेतली नसल्याने न्यायासाठी रोलीने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना फेसबुकवर एक पोस्ट लिहिली.या पोस्टमध्ये तिने न्यायाची मागणी केली. यानंतर तिने फेसबुकवर सर्व घटनाक्रम सांगितला. यानंतर रोलीने घरात स्वत:च्या साडीने गळफास घेत आत्महत्या केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.