मुंबई, 29 फेब्रुवारी : CNBC TV 18 इंडिया बिझनेस लीडर अॅवॉर्ड्स 2020 या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली. महाराष्ट्राला ‘स्टेट ऑफ द इयर’चा पुरस्कार मिळाल्याबाबत त्यांनी आंनंद व्यक्त केला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक नामवंतांiblना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. अशावेळी ‘मॅच फिक्सिंग’ झाली आहे की काय अशी शंका उपस्थित होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. त्यावेळी कार्यक्रमामध्ये एकच हशा पिकला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत अर्थव्यवस्था, शेअर मार्केट, तेजी-मंदीचे विषय जड सुरू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर येऊन वातावरण थोडं मोकळं केलं. देशातले नामवंत उद्योजक, अर्थतज्ज्ञ आणि माध्यमांच्या समोरच ठाकरे यांनी अर्थसंकल्प हा अवघड विषय असल्याचं मान्य केलं. आपण शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कशी बजेटपूर्वीच प्रतिक्रिया तयार ठेवायचो, याचे किस्सेही त्यांनी सांगितले.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the dignitaries in the presence of the Hon’ble FM @nsitharaman ji after Maharashtra was announced as the "State of the Year" by @CNBCTV18News pic.twitter.com/anAvl2N1Tg
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 28, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. त्यावर अनेक जणांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मिश्किल भाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यावर आलेल्या एका प्रतिक्रियेन लक्ष वेधून घेतलं. ती म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने दिलेली प्रतिक्रिया. उर्मिला मातोंडकरने अनेक विशेषणं वापरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं. ‘वाह.. सहज, सुंदर, चतुर, विनम्र’ अशी प्रतिक्रिया उर्मिला मातोंडकर हिने दिली आहे.
वाह.. सहज, सुंदर, चतुर, विनम्र 🙏🏼👏🏻
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) February 29, 2020
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती होती. या वर्षीचा सर्वोत्तम राज्याचा ’ स्टेट ऑफ द इयर’ पुरस्कार महाराष्ट्र राज्याला देण्यात आला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास, HDFC बँकेचे चेअरमन दीपक पारेख यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. दीपक पारेख यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.