अरुण गवळी कारागृहातून गिरवतोय शिक्षणाचे धडे, अंडरवर्ल्ड डॉन तीन विषयात PASS; पाहा BA ची मार्कशीट

अरुण गवळी कारागृहातून गिरवतोय शिक्षणाचे धडे, अंडरवर्ल्ड डॉन तीन विषयात PASS; पाहा BA ची मार्कशीट

Arun Gawli Education BA Marksheet: अरुण गवळी सध्या मुंबईतील शिवसेना नगरसेवकाच्या हत्ये प्रकरणी नागपूर कारागृहात (Nagpur Central Jail) जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. डॉन कारागृहातून शिक्षणाचे धडे (Education) गिरवत असल्याची माहिती पुढे आली आहे.

  • Share this:

नागपूर, 17 जुलै: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (Arun Gawli) हा सध्या कारागृहातून शिक्षणाचे धडे (Education) गिरवत असल्याची माहिती पुढे आली आहे. अरुण गवळी सध्या मुंबईतील शिवसेना नगरसेवकाच्या हत्ये प्रकरणी नागपूर कारागृहात (Nagpur Central Jail) जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

शिक्षणासाठी त्यानं इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात (Indira Gandhi Open University) बीएच्या (BA) अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे. बीएमध्ये (Bachelor of Arts) अरुण गवळी ने "द स्टडी ऑफ सोसायटी", सोसायटी इन इंडिया", "फाउंडेशन कोर्स इन हुम्यानिटी अँड सोशल सायन्स यासारख्या विषयांची निवड केली आहे. सध्या अरुण गवळी बीएच्या अंतिम वर्षात आहे.

न्यूज 18 लोकमतच्या हाती अरुण गवळीच्या बीएची मार्कशीट लागली आहे. परीक्षेत अरुण गवळी पाच पैकी तीन विषयात चांगल्या गुणाने पास देखील झाला आहे.

हेही वाचा- पालकांनो आपल्या मुलांना सांभाळा!, खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिला इशारा

इंदिरागांधी मुक्त विद्यापीठात प्रवेश देण्याआधी त्याने अभ्यासक्रमाविषयी आणि परीक्षेच्या प्रक्रियेविषयी चौकशी केली. त्यानंतर अरुण गवळीने बीएचे विषय निवडल्याचं विभागीय संचालक डॉ पी शिवस्वरूप यांनी सांगितले.

Published by: Pooja Vichare
First published: July 17, 2021, 9:02 AM IST

ताज्या बातम्या