मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ऑनलाईन गेममुळे 40 हजारांचं नुकसान; 13 वर्षीय मुलाची आत्महत्या, सुसाईट नोट वाचून पाणावतील डोळे

ऑनलाईन गेममुळे 40 हजारांचं नुकसान; 13 वर्षीय मुलाची आत्महत्या, सुसाईट नोट वाचून पाणावतील डोळे

मागील काही दिवसांपासून कृष्णा ऑनलाईन गेम फ्री फायर सतत खेळत होता. मृत्यूनंतर कृष्णाच्या जवळ एक सुसाईट नोट आढळली.

मागील काही दिवसांपासून कृष्णा ऑनलाईन गेम फ्री फायर सतत खेळत होता. मृत्यूनंतर कृष्णाच्या जवळ एक सुसाईट नोट आढळली.

मागील काही दिवसांपासून कृष्णा ऑनलाईन गेम फ्री फायर सतत खेळत होता. मृत्यूनंतर कृष्णाच्या जवळ एक सुसाईट नोट आढळली.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 31 जुलै : ऑनलाईन गेममध्ये (Online Game) पैसे खर्च करत असल्यानं एक आई आपल्या 13 वर्षाच्या मुलाला ओरडली. यानंतर मुलानं गळफास घेत आत्महत्या केली (Minor Boy Commits Suicide) आहे. घटनास्थळी सुसाईड नोट (Suicide Note) आढळून आली आहे. यात फ्री फायर (Free Fire) खेळताना 40 हजार रुपये हारल्याचं त्यानं म्हटलं आहे. सोबतच या मुलानं आपल्या आईची माफी मागत, आईला न रडण्याचा सल्ला दिला आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) छतरपुर जिल्ह्यातील आहे.

सागर रोडवर विवेक पांडे आपली पत्नी प्रिती पांडे, मुलगा कृष्णा आणि मुलगी यांच्यासोबत राहात होते. विवेक पॅथोलॉजी ऑपरेटर आहे, तर प्रिती जिल्हा रुग्णालयात आहेत. कृष्णा सहावीचा विद्यार्थी होता. शुक्रवारी दुपारी 3 वाजता वडील पॅथोलॉजीवर होते, तर प्रिती या हॉस्पिटलमध्ये होत्या. इतक्यात प्रिती यांना खात्यावरून 1500 रुपये कट झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला. आईने घरी असलेल्या आपल्या मुलाला फोन केला आणि पैसे का काढले याचं कारण विचारलं. मुलाने सांगितलं, की हे पैसे ऑनलाईन गेममुळे कट झाले आहेत. यानंतर आईनं नाराजी व्यक्त करत त्याला खडसावलं.

...अन् रात्री त्याच्या शेजारी येऊन झोपले 3 हिंस्त्र चित्ते; थरकाप उडवणारा VIDEO

यानंतर कृष्णा आपल्या रुममध्ये गेला. त्यानं दरवाजा आतून बंद केला. घरात असलेल्या त्याच्या मोठ्या बहिणीनं काही वेळ दरवाजा वाजवला, मात्र आतून काहीच उत्तर मिळालं नाही. मुलीनं याबाबत आपल्या वडिलांना माहिती दिली. आई-वडील लगेचच घरी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडला असता कृष्णानं गळफास घेतल्याचं त्यांना दिसलं.

चोर बाजारातून घेतला 90 पैशांचा तुटका चमचा, लाखोंची बोली लागल्याने बदललं नशीब!

मागील काही दिवसांपासून कृष्णा ऑनलाईन गेम फ्री फायर सतत खेळत होता. याआधी त्यानं अनेकदा पैसे हारले होते. मृत्यूनंतर कृष्णाच्या जवळ एक सुसाईट नोट आढळली. ही सुसाईड नोट इंग्रजीमध्ये लिहिली गेली होती. त्यानं यात फ्री फायर गेममध्ये आपण 40 हजार रुपये हरल्याचा खुलासा केला होता. यासोबतच त्यानं आपल्या आई-वडिलांची माफी मागितली होती.

First published:

Tags: Crime news, Game, Madhya pradesh, Suicide news