पुणे, 10 मे: विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी पुण्यातील माजी आमदार बाळासाहेब उर्फ चंद्रकांत शिवरकर (Balasaheb Shivarkar) आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजित शिवरकर (Abhijeet Shivarkar) यांच्यासह चौघांविरुद्ध कौटुंबीक हिंसाचाराप्रकरणी (Domestic violence) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिवरकर यांची सून 37 वर्षीय स्नेहा अभिजित शिवरकर यांनी वानवडी पोलिसांत फिर्याद दिली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी 38 वर्षीय पती अभिजित शिवरकर, 69 वर्षीय सासरे बाळासाहेब शिवरकर, सासू कविता बाळासाहेब शिवरकर (वय 66) आणि सोनाली सिद्धार्थ परदेशी (वय 40) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती अभिजित हे माजी नगरसेवक आहेत. या चारही जणाविरुद्ध भादंवि कलम 498 अ, 323, 504, 506, 34 अन्वये फिर्याद देण्यात आली आहे. मानसिक आणि शारीरिक छळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. वानवडी पोलिसांत (wanwadi police) या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा-आधी विष नंतर करंट देत काढला पतीचा काटा; डॉ. नीरज पाठक मर्डर केसचा उलगडा
फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीनुसार, मागील दोन वर्षांपासून शिवरकर कुटुंबीय सून स्नेहा अभिजित शिवरकर यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. त्याच बरोबर आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. नोव्हेंबर 2019 पासून एप्रिल 2021 या कालावधीत पीडितेवर कौटुंबीक हिंसाचार केला जात होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mla, Pune, Violence