मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /शिक्षक झाला भक्षक! प्रॅक्टिकलच्या नावाखाली 20 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार, पीडितेचा टोकाचा निर्णय

शिक्षक झाला भक्षक! प्रॅक्टिकलच्या नावाखाली 20 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार, पीडितेचा टोकाचा निर्णय

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

विद्यार्थिनी बीएच्या प्रथम वर्षात शिकत आहे. सध्या तिची परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे या विद्यार्थिनीचे परीक्षा केंद्र श्री महावीर जी नगरातील एका खासगी महाविद्यालयात आले होते.

करौली, 17 ऑगस्ट : शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. करौली जिल्ह्यातील हिंडौन शहर परिसरात एका शिक्षकाने आपल्याच 20 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बलात्काराच्या या घटनेनंर पीडित विद्यार्थिनीने गंभीरी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्याने जाणाऱ्यांनी तिला वाचवले.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

सध्या या पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी श्रीमहावीर जी पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षक रूपसिंह जाटव विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बलात्काराच्या या दुष्कर्मानंतर आरोपी शिक्षक फरार झाला आहे. अद्याप त्याला पकडण्यात आलेले नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले की, विद्यार्थिनी बीएच्या प्रथम वर्षात शिकत आहे. सध्या तिची परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे या विद्यार्थिनीचे परीक्षा केंद्र श्री महावीर जी नगरातील एका खासगी महाविद्यालयात आले होते. आरोपी शिक्षक हा तिच्या ओळखीचा होता. त्यामुळे या शिक्षकासह विद्यार्थिनीला दुचाकीवरून परीक्षा देण्यासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, परीक्षा देऊन परतत असताना प्रॅक्टिकलच्या नावाखाली शिक्षकाने या विद्यार्थिनीला एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे या नराधमाने विद्यार्थिनीवर मुलीवर बलात्कार केला.

यानंतर त्याने घटनास्थळावरुन पोबारा केला. या घटनेनंतर पीडित तरुणी अत्यंत घाबरुन गेली होती. त्यामुळे तिने तेथीलच गंभीर नदीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तेथून जाणाऱ्या काही लोकांनी तिला वाचवले. तसेच याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा - 20 वर्षीय पोटच्या मुलीवर बापाकडून बलात्कार, पीडितेने लावले गंभीर आरोप

याप्रकरणी नातेवाइकांच्या वतीने श्री महावीरजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर विद्यार्थिनीला हिंडौनच्या जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे चार डॉक्टरांच्या पथकाने तिची वैद्यकीय तपासणी केली. पोलीस उपअधीक्षक किशोरीलाल यांनी सांगितले की, गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी शिक्षकाचा शोध सुरू आहे. आतापर्यंत त्याचा शोध लागला नाही. पोलीस याप्रकरणी कसुन चौकशी करत आहेत. दरम्यान, या घटनेने पीडितेच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

First published:
top videos