मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /तु नवऱ्याची झाली नाहीस तर माझी काय होणार, ऐकल्यावर 4 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलेल्या प्रेयसीचं भयानक कृत्य

तु नवऱ्याची झाली नाहीस तर माझी काय होणार, ऐकल्यावर 4 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलेल्या प्रेयसीचं भयानक कृत्य

फिरोज हा मूळचा उत्तर प्रदेशातील संभल भागातील रहिवासी होता. मात्र, तो दिल्लीत कामाला होता.

फिरोज हा मूळचा उत्तर प्रदेशातील संभल भागातील रहिवासी होता. मात्र, तो दिल्लीत कामाला होता.

फिरोज हा मूळचा उत्तर प्रदेशातील संभल भागातील रहिवासी होता. मात्र, तो दिल्लीत कामाला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

गाजियाबाद, 8 ऑगस्ट : उत्तरप्रदेशमधील गाझियाबादमध्ये सोमवारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 4 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रेयसीने प्रियकराची हत्या केली आहे. इतकेच नव्हे तर हत्येनंतर मृतदेह 24 तास फ्लॅटमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

प्रेयसीने आपल्या प्रियकराची हत्या केली आहे. प्रियकर फिरोजने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी दुपारी दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर संधी साधून प्रितीने धारदार शस्त्राने फिरोजचा गळा चिरला. हत्येनंतर मृतदेह 24 तास फ्लॅटमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. आरोपी महिला पती दीपक यादवला सोडून प्रियकर फिरोजसोबत गेल्या 4 वर्षांपासून राहत होती. याप्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

फिरोज हा मूळचा उत्तर प्रदेशातील संभल भागातील रहिवासी होता. मात्र, तो दिल्लीत कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून प्रीती फिरोजवर लग्नासाठी दबाव टाकत होती. पण जी आपल्या नवऱ्याची नाही झाली, ती माझी काय होणार, या शब्दात फिरोजने प्रीतीला नकार दिला. हे ऐकून प्रीती चिडली आणि तिने जवळच ठेवलेल्या वस्तऱ्याने गळा चिरून फिरोजचा खून केला.

यानंतर फिरोजचा मृतदेह एका मोठ्या ट्रॉली बॅगेत टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा कटही प्रीतीने रचला. मात्र, काल रात्री बेगमध्ये फिरोजचा मृतदेह लपवण्यासाठी घरापासून काही अंतरावर निघालेल्या प्रीतीला गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अडवले. चौकशीत प्रीतीचे हावभाव पाहून पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी बॅग उघडली तेव्हा तेही चक्रावून गेले. तिची कसून चौकशी केली असता प्रीतीने आपला गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. फिरोज हा हेयर कटिंगचे काम करायचा

हेही वाचा - 20 वर्षे आनंदात एका छताखाली राहिले, 50 व्या वर्षी कोथरुडच्या महिलेकडून बलात्काराची तक्रार

प्रीतीने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, “मला जास्त काळ लिव्ह-इनमध्ये राहायचे नव्हते. फिरोजला वारंवार लग्न करण्यास सांगत होते. शनिवारी रात्रीही याच मुद्द्यावरून भांडण झाले. फिरोज मला म्हणाला की, तू फसवणारी महिला आहेस, तु तुझ्या नवऱ्याची झाली नाही, तर माझी काय होशील, असे म्हटल्यावर मला राग आला आणि मी त्याचा खून केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Murder news, Up crime news, Uttar pradesh news