जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पुणे : 20 वर्षे आनंदात एका छताखाली राहिले, 50 व्या वर्षी कोथरुडच्या महिलेकडून बलात्काराची तक्रार

पुणे : 20 वर्षे आनंदात एका छताखाली राहिले, 50 व्या वर्षी कोथरुडच्या महिलेकडून बलात्काराची तक्रार

पुणे : 20 वर्षे आनंदात एका छताखाली राहिले, 50 व्या वर्षी कोथरुडच्या महिलेकडून बलात्काराची तक्रार

मागील 20 वर्षांपासून एक महिला आणि पुरुष सोबत राहत होते. मात्र, त्या दोघांमध्ये काही कारणांमध्ये वाद झाले.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 6 ऑगस्ट : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. पुण्यातूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक महिला आणि पुरुष तब्बल 20 वर्ष सोबत राहत होते. मात्र, 50 व्या वर्षी महिलेने बलात्काराची तक्रार केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - मागील 20 वर्षांपासून एक महिला आणि पुरुष सोबत राहत होते. मात्र, त्या दोघांमध्ये काही कारणांमध्ये वाद झाले. त्यानंतर महिलेचे एक तक्रार केली आहे. आपल्यासोबतच्या पुरुषाने लग्नाचे आमिष दाखवून आपल्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, अशी तक्रार केली आहे. चतु: श्रृंगी पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर 54 वर्षाच्या नागरिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्यक्ती कर्नाटकातील आहे. हेही वाचा -  Pune Police : ‘तुमचा पोपट माझी दुपारची झोप मोड करतो’ पुणेकराने केली पोलिसांत तक्रार आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेसोबत बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले, तक्रारीत म्हटले आहे. तसेच या महिलेला मारहाणही करण्यात मारहाण केली, यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोथरुडमधील 50 वर्षाच्या महिलेने ही तक्रार केली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात