जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / शरीर संबंधानंतर केलं लग्न, संशय आल्यानंतर नवरी पोहोचली घरी...ते दृश्य पाहून हादरलीच!

शरीर संबंधानंतर केलं लग्न, संशय आल्यानंतर नवरी पोहोचली घरी...ते दृश्य पाहून हादरलीच!

शरीर संबंधानंतर केलं लग्न, संशय आल्यानंतर नवरी पोहोचली घरी...ते दृश्य पाहून हादरलीच!

तरुणाने एका महिलेसोबत फेसबुकच्या (Facebook Friend) माध्यमातून मैत्री केली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 3 जून : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh News) ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामुळे लग्नासारख्या पवित्र नात्याला काळीमा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरमधील तरुणाने एका महिलेसोबत फेसबुकच्या (Facebook Friend) माध्यमातून मैत्री केली होती. यानंतर लग्नाचं आमिष दाखवित तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. यानंतर त्याने लग्न केलं. लग्नानंतर दोन महिन्यांपर्यंत तरुण तिला घरी घेऊन गेला नाही. ज्यानंतर तिला संशय आला, आणि ती स्वत: तरुणाच्या घरी पोहोचली. यावेळी तिने असं काही पाहिलं की, तिला धक्काच बसला. घरी पोहोचताच  महिलेला कळालं की, तरुणाचं आधीच लग्न झालं असून त्याला दोन मुलंही आहेत. फेसबुकवर मैत्री, हॉटेलमध्ये बोलावून अनेकदा ठेवले शरीर संबंध ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणीची फेसबुकवर मनीष कुशवाह या तरुणासोबत ओळख झाली होती. हळूहळू त्यांची मैत्री झाली. यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. एके दिवशी तरुणाने तिला हॉटेलमध्ये बोलावलं आणि लग्नाचं आमिष देऊन शरीर संबंध ठेवलं. यानंतरही तो वारंवार तरुणीला लग्नाचं आमिष देत तिच्यासोबत शरीर संबंध ठेवत होता. मंदिरात केलं लग्न, मात्र घरी घेऊन जाण्यास नकार… तरुणीने दबाव आणल्यानंतर तरुणाने तिच्यासोबत लग्न केलं आणि यानंतर तो तरुणीच्या घरी शिफ्ट झाला. आणि नव्या नवरीला आपल्या घरी नेण्यास टाळाटाळ करू लागला. लग्नानंतरही त्याने वारंवार तरुणीसोबत शरीर संबंध ठेवले. यानंतर तरुणीला संशय आला आणि एकेदिवशी ती थेट तरुणाच्या घरी पोहोचली. यानंतर तिने जे काही पाहिलं त्यानंतर तिला धक्काच बसला. घरी पोहोचली तर महिलेने उघडलं दार… तरुणाच्या घरी पोहोचताच नव्या नवरीला कळालं की, तो आधीच विवाहित आहे आणि त्याला दोन मुलंही आहेत. हे पाहताच तरुणी तातडीने पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात