Home /News /crime /

विधीदरम्यान स्टेजखाली उभी राहिली नवरदेवाची आई; सासूचे शब्द ऐकताच नवरीचा लग्नास नकार

विधीदरम्यान स्टेजखाली उभी राहिली नवरदेवाची आई; सासूचे शब्द ऐकताच नवरीचा लग्नास नकार

पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला, मात्र शेवटपर्यंत नवरीने कोणाचच ऐकलं नाही.

    लखनऊ, 26 मे : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मिर्झापूर जिल्ह्यातील डोहरी गावातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. लग्नमंडपात नवरीने लग्नास नकार दिल्यानंतर वरात परतल्याचा प्रकार घडला होता. मंगळवारी सायंकाळी वाजत-गाजत वरात नवरीच्या दारासमोर उभी राहिली होती. मात्र नवरीला न घेताच वरात परतली. लग्नाचे शेवटचे विधी सुरू होण्यापूर्वी नवरदेवाच्या आईने भर लग्नमंडपात 50 हजार रुपयांची कॅश आणि बाईकची मागणी केली. इतकच नाही तर हुंडा दिला नाही तर लग्न रोखण्याची धमकीही दिली. नवरीच्या नातेवाईकांनी त्यांची समजून काढण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र सासू काहीही ऐकण्यास तयार नव्हती. हुंडा दिला नाही तर लग्न होणार नसल्याची त्यांची भूमिका होती. बराच वेळ हे सर्व पाहात उभ्या असलेल्या नवरीने भर लग्नमंडपात नवरदेवाच्या आईला लग्न करणार नसल्याचं सांगितलं. आणि नवरदेवासोबत सप्तपदी झाल्यास नकार दिला. नवरदेवाच्या नातेवाईकांकडून सुरू असलेल्या प्रकारामुळे नाराज लोकांनी वरातीतील पाहुण्यांना एका खोलीत डांबलं. शेवटी नवरदेवाचे नातेवाईक लग्नासाठी तयार झाले. मात्र तरुणीने हे लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला. यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र नवरदेवाला नवरीशिवाय घरी परतावं लागलं.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Marriage, Uttar pardesh

    पुढील बातम्या