Home /News /crime /

किळसवाणं कृत्य! मुलासाठी पत्नीला मोठ्या भावाकडे सोपवलं, नराधमाने केली भयंकर अवस्था

किळसवाणं कृत्य! मुलासाठी पत्नीला मोठ्या भावाकडे सोपवलं, नराधमाने केली भयंकर अवस्था

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

शेवटी पीडितेने तिच्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

    ग्वाल्हेर, 26 मे : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) ग्वाल्हेरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. लग्नाच्या दोन वर्षांनंतर मूल न झाल्यानंतर पतीने धक्कादायक (Crime News) पाऊल उचललं. पतीने आपल्या पत्नीला मोठ्या भावाकडे सोपवलं. मोठा दीर तीन वर्षांपर्यंत महिलेवर बलात्कार करीत होता. यापुढील धक्कादायक बाब म्हणजे पती आणि मोठी वहिणी आपल्या समोर मोठा दीर आणि महिलेला जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होते. इतकं करूनही मूल न झाल्यानं पतीने पत्नीला घराबाहेर काढलं. याला त्रासून पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पती, मोठा दीर आणि मोठ्या वहिनीविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात 27 वर्षीय विवाहीत महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये तिचं लग्न झालं होतं. तिचा पती आणि मोठा दीर ग्वाल्हेरमधील एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होते. लग्नानंतर ती पतीसोबत एका भाड्याच्या घरात राहत होती. येथे त्यांच्यासोबत मोठा दीर आणि मोठी वहिनीही राहत होते. महिलेने पोलिसांना पुढे सांगितलं की, लग्नाच्या दोन वर्षांनंतरही मूल न झाल्याने विवाहितेने पतीला तपासणी करण्यास सांगितलं. मात्र पतीने डॉक्टरांकडे जाण्यास नकार दिला. एके दिवशी पतीने पत्नीला मोठ्या भावासोबत शरीर संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली. विवाहितेने यास नकार दिला. मात्र 20 जुलै 2017 रोजी मोठा दीर-वहिनी त्यांच्या खोलीत आहे. वहिनीने दार लावलं आणि यानंतर मोठ्या दीराने तिच्यावर बलात्कार केला. मूल होण्याच्या नावाखाली तीन वर्षे अत्याचार.. यानंतर वारंवार महिलेवर बलात्कार केला जात होता. पती आणि मोठी वहिनी खोलीतील एका कोपऱ्यात उभं राहून महिलेवरील बलात्कार पाहत होते. पीडिता तीन वर्षांपर्यंत हे सर्व सहन करत होती. बदनामीच्या भीतीने महिलेने कोणाला काहीच सांगितलं नव्हतं. मात्र तीन वर्षांपर्यंत मूल न झाल्यानंतर पती आणि मोठ्या दीरात भांडणं झाली. यानंतर पती पत्नीला घेऊन कानपूरला निघून गेला. येथेही महिलेवरील अत्याचार कमी झाले नाही. पतीने पत्नीला घराबाहेर काढलं. शेवटी पत्नी माहेरी पोहोचली आणि त्यांना घडलेला प्रकार सांगितला.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Rape

    पुढील बातम्या