मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अकलेचा दुष्काळ! YouTube Video पाहून घरीच पत्नीची डिलिव्हरी, बाळाचा मृत्यू

अकलेचा दुष्काळ! YouTube Video पाहून घरीच पत्नीची डिलिव्हरी, बाळाचा मृत्यू

डिलिव्हरीसाठी पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याऐवजी त्याने एक यूट्यूब व्हिडिओ पाहून घरीच डिलिव्हर करण्याचा निर्णय घेतला.

डिलिव्हरीसाठी पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याऐवजी त्याने एक यूट्यूब व्हिडिओ पाहून घरीच डिलिव्हर करण्याचा निर्णय घेतला.

डिलिव्हरीसाठी पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याऐवजी त्याने एक यूट्यूब व्हिडिओ पाहून घरीच डिलिव्हर करण्याचा निर्णय घेतला.

चेन्नई, 20 डिसेंबर: यूट्यूब व्हिडिओ (YouTube Video) पाहून घरीच आपल्या पत्नीची डिलिव्हरी (Delivery of Wife) करण्याचा प्रयत्न करणं एका कुटुंबाला फारच महागात पडलं. पतीने यूट्यूब व्हिडिओ पाहून आपणही घरीच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र डिलिव्हरीदरम्यान कॉम्प्लिकेशन्स (Complications) झाल्यामुळे बाळाचा यात मृत्यू (Death of baby) झाला, तर महिला गंभीर (Wife serious) जखमी झाली आहे.

असं केलं ऑपरेशन

तमिळनाडूमधील रानीपेट भागात राहणाऱ्या 32 वर्षांच्या लोगानाथनचं लग्न एक वर्षांपूर्वी गोमती नावाच्या महिलेसोबत झालं होतं. त्यानंतर काही महिन्यात ती गर्भवती राहिली आणि डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डिलिव्हरीची संभाव्य तारीख तिला देण्यात आली होती. तारीख उलटून तीन ते चार दिवस झाले तरी तिला प्रसवकळा सुरू झाल्या नव्हत्या. त्यानंतर 18 डिसेंबर रोजी तिला लेबर पेन व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी पत्नीला तातडीनं हॉस्पिटलमध्ये न हलवता घरीच तिची डिलिव्हरी करण्याचा निर्णय़ तिच्या पतीने घेतला. आपल्या बहिणीला सोबत घेऊन त्याने यूट्यूब व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे डिलिव्हरी करण्याचा निर्णय़ घेतला.

रक्तस्त्रावाने बाळाचा मृत्यू

डिलिव्हरी करताना प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यामुळे बाळाचा पोटातच मृत्यू झाला, तर महिला बेशुद्ध पडली. या गंभीर अवस्थेत काय करावं, हे न समजल्यामुळे अखेर त्याने आपल्या पत्नीला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी तिची तपसणी केली असता रक्तस्त्राव होऊन बाळाचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं, तर महिला गंभीर जखमी झाली होती. डॉक्टरांनी ऑपरेशन करून बाळ तिच्या गर्भातून बाहेर काढलं आणि महिलेवर उपचार सुरू केले.

हे वाचा- Fabindia IPO : फॅब इंडिया आणणार आपला IPO, 4000 कोटी उभारण्याचं टार्गेट

पोलीस तपास सुरू

गोमतीची अवस्था पाहिल्यानंतर घरीच डिलिव्हरीचा प्रयत्न केल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यांनी पोलिसांना या बाबीची कल्पना दिल्यानंतर पोलिसांनी केस दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. डिलिव्हरीसारख्या गंभीर बाबीदेखील यूट्यूब व्हिडिओच्या मदतीनं घरी करण्याचा प्रयत्न करणं, हा तद्दन मूर्खपणा असल्याची चर्चा सध्या होत असून असा प्रयत्न करणाऱ्या पतीवर सर्व स्तरातून टीका होत आहे.

First published:
top videos

    Tags: Baby died, Mother, Tamil nadu, Youtube