पाटणा 26 मार्च : होळीच्या दिवशी गावात आलेल्या तरुणाला बिहारमध्ये दारू प्यायला मिळाली नाही, तेव्हा त्याने थेट नितीश कुमार यांचा सरकारी बंगला म्हणजेच सीएम हाऊस उडवून देण्याची धमकी दिली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अंकित कुमार या तरुणाला पोलिसांनी तपासानंतर शुक्रवारी सोडून दिलं. चौकशी आणि तपासानंतरही आरोपीविरुद्ध कोणताही ठोस गुन्हेगारी पुरावा सापडला नाही, त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे.
पाटणाच्या सचिवालय पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने मद्यधुंद अवस्थेत ही धमकी दिली होती. तपासात त्याचा कोणताही चुकीचा हेतू समोर आला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली जिल्ह्यातील लालगंज येथील रहिवासी असलेला अंकित हा गुजरातमधील सुरत येथे काम करतो. तो रोज दारू पितो. होळीत गुजरातहून आपल्या गावी पोहोचल्यावर त्याला दारू प्यायला मिळाली नाही, त्यानंतर दारूबंदी लागू केल्याबद्दल तो मुख्यमंत्र्यांवर चांगलाच संतापला.
स्टेशनवर नवरा-बायकोचं झालं भांडण अन् प्रकरण गेलं थेट ईडीकडे, अधिकारीही चक्रावले
गुजरातमध्ये गेल्यानंतर तिथे भरपूर मद्यपान करून गुगलवरून एका वृत्तवाहिनीचा फोन नंबर काढल्याचं तरुणाने पोलिसांना सांगितलं. त्याला वेगळंच काही बोलायचं होते, पण मुख्यमंत्री आणि त्यांचं निवासस्थान बॉम्बने उडवल्याची गोष्ट त्याच्या तोंडून निघाली. दारूच्या नशेत असल्याने तो काय बोलला हे त्यालाच कळेना. या प्रकरणी गुजरात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता अंकितने काय मोठा गुन्हा केला आहे, हेच समजत नव्हतं. या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलची झडती घेतली आणि त्याच्या मूळ गावातील गुन्हेगारी रेकॉर्डचीही चौकशी केली.
त्याच्या नातेवाईकांची आणि साथीदारांचीही चौकशी करण्यात आली होती, मात्र तपासात पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळू शकला नाही किंवा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड सापडला नाही. आरोपी अंकितला गुजरात पोलिसांनी सुरत येथून अटक केली होती. तपासासाठी पाटणा पोलिसांचं एक पथकही गुजरातमध्ये पोहोचलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm, Liquor stock, Nitish kumar