जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / स्टेशनवर नवरा-बायकोचं झालं भांडण अन् प्रकरण गेलं थेट ईडीकडे, अधिकारीही चक्रावले

स्टेशनवर नवरा-बायकोचं झालं भांडण अन् प्रकरण गेलं थेट ईडीकडे, अधिकारीही चक्रावले

स्टेशनवर नवरा-बायकोचं झालं भांडण अन् प्रकरण गेलं थेट ईडीकडे, अधिकारीही चक्रावले

पती-पत्नीच्या वादात नऊ हजार रुपये किमतीचे अमेरिकन चलन सापडल्याने उत्तर प्रदेशातील वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Local18 Uttar Pradesh
  • Last Updated :

रवि पांडेय (वाराणसी) 25 मार्च : पती-पत्नीच्या वादात नऊ हजार रुपये किमतीचे अमेरिकन चलन सापडल्याने उत्तर प्रदेशातील वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. यामधेय विदेशी चलनाची धागेदोरे बिहारशी जोडल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी ईडीला पाचारण केले आहे. आता ईडी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे.

जाहिरात

उत्तर प्रदेशच्या कॅन्ट रेल्वे स्थानकावर एक दाम्पत्य पटनाला जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत होते. यादरम्यान पती-पत्नीमध्ये भांडण झाले. प्रकरण इतके वाढले की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान पोलीस जवळ येताच पत्नीने या प्रकरणाची उकल केली पतीकडे विदेशी चलन असल्याचे तीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पतीचा झाडाझडती करताच त्याच्याकडे 9 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर सापडले, ज्याची किंमत भारतीय चलनात 7 लाख 50 हजार रुपये आहे.

ऐन जवानीमध्ये दोघांनी केलं कांड, म्हातारपणी झाली अटक, कोर्टाने पाठवलं जेलमध्ये!

यावेळी पोलीस अधिकारी प्रभारी हेमंत सिंह यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गौतम असून तो पाटणाचा रहिवासी आहे. चौकशीत गौतमने वाराणसीतील एका व्यक्तीकडून हे चलन मिळाल्याचे सांगितले. जो तो पाटणा येथील नामांकित हॉटेल मौर्या हॉटेलमध्ये घेऊन जात होता. हे पैसे मौर्या हॉटेलच्या मालकाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात
आली लहर केला कहर! एकटेपणाने कंटाळला, 300 मुलींना दिला धोका, प्रेमासाठी नाही तर…

डॉलर्स मोजून जप्त करताना पोलिसांनी आरोपी गौतमला अटक केली आहे. यासोबतच या प्रकरणात बिहार कनेक्शन जोडण्यात आल्याने पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीला कळवले आहे. ईडी आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे, जेणेकरून परकीय चलनाच्या या फेरफाराचे संपूर्ण रहस्य उलगडू शकेल. काही दिवसांपूर्वी बनारस रेल्वे स्थानकावरून एक कोटी रुपये जप्त करण्यात आले होते, जे हवालाशी संबंधित असल्याचे सांगितले जात होते. आता विदेशी डॉलर जप्त करण्यात आले असल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात