नवी दिल्ली 14 नोव्हेंबर : गाजियाबादच्या (Ghaziabad) वसुंधरा सेक्टर तीन मधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. यात एका मेहुण्यानेच एक एक करून आपल्या दाजीच्या दोन कार चोरल्या. त्याने आपल्या दाजीच्या कार ज्या कारणासाठी चोरल्या ते ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल. मेहुण्याला फार्म्यूला वन रेसमध्ये (Formula One Race) भाग घ्यायचा होता. हाच छंद पूर्ण करण्यासाठी त्यानं कारची चोरी केली. आपल्या दाजीच्या दोन्ही कार विकून त्याला स्पोर्ट्स कार (Sports Car) विकत घ्यायची होती आणि रेसमध्ये भाग घ्यायचा होता.
रहस्यमयी! या जंगलात गेलेलं कोणीच परत येत नाही; आत जाताच आत्महत्या करतात लोक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वरुण पाठक नावाचा व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत गाजियाबादच्या वसुंधरा सेक्टर तीनमध्ये राहतात. याच वर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्या घराच्या पार्किंगमधून इको स्पोर्ट कार चोरी झाली. त्यांनी इंदिरापुरम येथे याची तक्रार केली. यानंतर त्यांनी एक पोलो कार खऱेदी केली. मात्र ही नवीन कारही काहीच आठवड्यात चोरी झाली.
नवी कार चोरी झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा पोलिसांत तक्रार केली. दोन वेळा चोरी झाल्याने यात जवळच्याच व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आला. तपासात अशी माहिती मिळाली की एक तरुण चोरीच्या कारसोबत वसुंधरा लाल बत्तीजवळ दिसला होता. यानंतर पोलिसांनी चेकिंग लावून कारसोबत एका युवकाला पकडलं.
ट्रॅक्टरच्या धडकेत वाचले पण ट्रकनं चिरडलं; जीवलग मित्रांचा रस्त्यावरच गेला प्राण
या युवकाकडे चौकशी केली असता त्यानं आपलं नाव पुलकित शर्मा असल्याचं सांगितलं.. पोलिसांनी आणखी चौकशी केली असता समजलं की तो वरुण पाठक यांचा मेहुणा आहे आणि त्यानंच आपल्या दाजीची कार चोरी केली. पोलीस चौकशीत त्यानं सांगितलं की त्याला फॉर्म्यूला वन रेसमध्ये भाग घेण्याची इच्छा होती. यासाठी त्याला महागडी स्पोर्ट्स कार घ्यायची होती. म्हणूनच ही कार खरेदी करण्यासाठी त्यानं दाजीच्याच दोन कार चोरून विकण्याचा कट रचला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi News, Theft