• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • धक्कादायक ! 'तू मला पसंत नाहीस' म्हणत महिन्याभरातच दिला तलाक मग अंगावर पेट्रोल ओतून पेटवलं

धक्कादायक ! 'तू मला पसंत नाहीस' म्हणत महिन्याभरातच दिला तलाक मग अंगावर पेट्रोल ओतून पेटवलं

Representative Image

Representative Image

Man sets wife on fire: नवविवाहित महिलेचा छळ करुन मग तिला पटेवून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 • Share this:
  बीड, 20 नोव्हेंबर : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी (Shocking news from beed) समोर आली आहे. एका नवविवाहित महिलेचा छळ करुन मग तिला पेटवून जाळण्याचा प्रयत्न (man sets wife on fire) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Newly wedded wife sets on fire by husband in beed) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीड शहरातील मामला परिसरातील ही घटना आहे. येथील सरफराज मोमीन नावाच्या मुलाचा गेल्या महिन्यातच विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सरफराज आणि सासरच्या मंडळींकडून नवविवाहितेचा छळ सुरू केला. यानंतर पीडित महिलेने हा प्रकार आपल्या माहेरच्यांनाही सांगितला. मग दोन्ही कुटुंबातील सदस्यांमध्ये चर्चाही झाली. वाचा : पोलीस असल्याचं सांगत आधी काढले फोटो, मग बॉयफ्रेंडसमोरच केला गर्लफ्रेंडवर बलात्कार शुक्रवारी सरफराज याने पत्नीला तोंडी तलाक दिला. यानंतर आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत पत्नीवर पेट्रोल ओतले आणि मग तिला पेटवून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित महिलेचे कुटुंबीय घटास्थळी दाखल झाल्याने त्यांनी मुलीचे प्राण वाचवले. या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, पती सरफराज आणि त्याच्या इतर कुटुंबातील सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. वाचा : माहेरी आलेल्या मुलीला घराबाहेर बोलावून घातल्या गोळ्या, 6 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न नांदेडमध्ये सासरच्या मंडळीच्या छळानं घेतला बापलेकीचा जीव नांदेड जिल्ह्यातील देगलूर याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सासरच्या मंडळींकडून सातत्याने लेकीचा होणारा छळ बघवल्याने वडिलांनीच आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर जबरदस्त धक्का बसल्याने विवाहित मुलीचाही मृत्यू झाला आहे. काही तासांच्या अंतराने बापलेकीच्या झालेल्या दुर्दैवी अंतामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही हृदय हेलावणारी घटना देगलूर तालुक्यातील सुगाव येथे घडली आहे. शंकर परशुराम भोसले असं आत्महत्या करणाऱ्या वडिलांचं नाव आहे. तर वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने मृत पावलेल्या मुलीचं नाव माधुरी आहे. देगलूर तालुक्यातील सुगाव येथील रहिवासी असणाऱ्या शंकर भोसले यांची मोठी मुलगी माधुरी हिचा विवाह 12 जुलै 2020 रोजी उंद्री येथील नणंदेचा मुलगा संदीप वडजे (25) याच्याशी झाला होता. लग्नानंतर 15 दिवसापासूनच सासु रावणबाई वडजे, सासरा हनुमंत वडजे आणि नणंद शीला आणि प्रणिता हे सर्वजण माधुरीला विविध कारणातून त्रास देत होते.
  First published: