जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / आधी नाव विचारलं; डिलिव्हरी बॉयची जात समजताच जेवणाची ऑर्डर स्विकारण्यास नकार देत केलं धक्कादायक कृत्य

आधी नाव विचारलं; डिलिव्हरी बॉयची जात समजताच जेवणाची ऑर्डर स्विकारण्यास नकार देत केलं धक्कादायक कृत्य

आधी नाव विचारलं; डिलिव्हरी बॉयची जात समजताच जेवणाची ऑर्डर स्विकारण्यास नकार देत केलं धक्कादायक कृत्य

विपिन कुमार रावत हे शनिवारी रात्री आशियाना सेक्टर एच येथील अजय सिंह यांच्या घरी जेवणाची ऑर्डर पोहोचवण्यासाठी गेले होते. त्यांनी आरोप केला की, ऑर्डर देताना दारात आलेल्या एका व्यक्तीने त्यांचं नाव विचारलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ 20 जून : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या आशियानामध्ये ग्राहकाने फूड डिलिव्हरी बॉयची जात विचारून जेवण घेण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. शहरातील किला मोहम्मदी परिसरात राहणारे विपिन कुमार रावत हे एका खासगी कंपनीत एसी तंत्रज्ञ आहेत. यासोबतच ते झोमॅटो कंपनीत अर्धवेळ डिलिव्हरी बॉय (Zomato Food Delivery Boy) म्हणूनही काम करतात. मुजोर रिक्षावाल्याची इतकी हिंमत? थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली, पाहा Video विपिन कुमार रावत हे शनिवारी रात्री आशियाना सेक्टर एच येथील अजय सिंह यांच्या घरी जेवणाची ऑर्डर पोहोचवण्यासाठी गेले होते. त्यांनी आरोप केला की, ऑर्डर देताना दारात आलेल्या एका व्यक्तीने त्यांचं नाव विचारलं. विपिन कुमार रावत असं आपलं नाव सांगताच त्या व्यक्तीनं त्यांना जातीवाचक शब्दात संबोधित करत दलिताच्या हातातील अन्न घेण्यास नकार दिला. यानंतर ऑर्डर रद्द करा असं सांगितल्यावर हा व्यक्ती संतापला आणि त्याने विपिन कुमार यांच्या तोंडावर तंबाखू थुंकली. विपिन रावत यांच्या म्हणण्यानुसार, ‘विरोध केल्यानंतर 10-12 लोक घरातून बाहेर आले आणि त्यांनी मला मारहाण केली. यादरम्यान मला माझी दुचाकी जागीच सोडून पळून जावं लागलं.’ यानंतर विपिनने यूपी 112 ला फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी विपिनला त्याची दुचाकी परत मिळवून दिली. डिलिव्हरी बॉयने या संपूर्ण घटनेबाबत आशियाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रेयसीचे हट्ट पुरवण्याच्या नादात बनला चोर; तब्बल 27 दुचाकी चोरणाऱ्या प्रियकराला अटक या संपूर्ण प्रकरणावर आरोपींचं म्हणणं आहे की, त्यांच्या घरात स्वयंपाकाचं काम एक दलित महिलाच करते. थुंकत असताना ते चुकून डिलिव्हरी बॉय विपिन कुमार रावत यांच्या अंगावर पडलं. ज्याच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात