जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मुजोर रिक्षावाल्याची इतकी हिंमत? थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली, पाहा Video

मुजोर रिक्षावाल्याची इतकी हिंमत? थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली, पाहा Video

मुजोर रिक्षावाल्याची इतकी हिंमत? थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली, पाहा Video

वाशी रेल्वे स्थानकाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणातून रिक्षाचालकाने थेट पोलिसाच्या कानशिलात (Rickshaw driver beats police) लगावली असल्याचे समोर आले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 जून : तुम्ही अनेकदा रिक्षावाल्यांच्या मुजोरीबद्दल बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. भाडे नाकारण्यापासून जास्तीचं भाडं आकारल्याने तुमचीही कधीतरी रिक्षावाल्यांसोबत तू-तू मै-मै झाली असेल. असाच एक धक्का प्रकार वाशी रेल्वे स्थानकाजवळ (Vashi railway station) घडला आहे. मात्र, हा प्रकार काही सामान्य माणसासोबत नाही तर एका पोलिसासोबत घडला आहे. रिक्षाचालकाने भाडे नाकारल्याने पोलीस आणि रिक्षाचालकांमध्ये बाचाबाची झाल्याने रागाच्या भरामध्ये रिक्षाचालकाने थेट पोलिसाच्या कानाखाली (Rickshaw driver beats police) दिली. कायद्याच्या रक्षकांसोबतच जर अशा घटना घडत असतील तर सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय होती घटना? वाशी रेल्वे स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याला एका आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी वाशी येथील मनपा रुग्णालयात घेऊन जायचे होते. त्यासाठी त्यांनी स्टेशनजवळ असलेल्या एका रिक्षाचालकाला विचारणार केली. मात्र, त्याने भाडे नाकारल्याने पोलीस आणि रिक्षाचालकांमध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान राग अनावर झाल्याने रिक्षाचालकाने पोलिसाच्या कानाखाली दिली तसेच रिक्षाचालकांच्या साथीदाराकडून पोलिसांना शिवीगाळ करण्यात आली. या घटनेनंतर वाशी पोलीस स्टेशनला कलम 353, 332, 323, 504, 506 लावून रिक्षाचालकावर आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या दोन्ही आरोपींना अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी दिली. घटनेचा व्हिडीओ…

पोलिसांवर हल्ल्याच्या घटना वाढतायेत पोलिसांवर हल्ला झाल्याची ही घटना काही पहिलीच नाही. यापूर्वीही अनेक ठिकाणी रिक्षाचालकांची मुजोरी समोर आली आहे. या अशा रिक्षाचालकांकडून सर्वसामान्यांनाही बऱ्याचदा त्रास झाल्याचे समोर आले आहे. मात्र, आता थेट वर्दीवरच हात उचलल्याने मुजोर रिक्षावाल्यांचा बंदोबस्त होणार का? असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात