Home /News /mumbai /

पाकिस्तानी दहशतवादी मॉड्युलचं मुंबई कनेक्शन, दहशतवाद्यांच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती आली समोर

पाकिस्तानी दहशतवादी मॉड्युलचं मुंबई कनेक्शन, दहशतवाद्यांच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती आली समोर

दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आता तपासात नवी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई, 15 सप्टेंबर : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) सहा दहशतवाद्यांना अटक (Six terrorist arrest) केली आहे. या सहा दहशतवाद्यांपैकी एक हा मुंबईत राहत असल्याची माहिती समोर आली. दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क झाल्या आहेत. या दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यावर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी मॉड्युलचं मुंबई कनेक्शन समोर आलं आहे. हे दहशतवादी उत्तरप्रदेशातील निवडणुका आणि मुंबईत घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या दहशतवाद्यांना मुंबईतून पैसा पुरवला गेला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. Kasab ने ट्रेनिंग घेतलेल्या टेरर कॅम्पमध्येच Dawood च्या हस्तकांनी घेतलेली ट्रेनिंग, तपासात माहिती उघड सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांना मुंबईतून फंडिग करण्यात आलं होतं. हा पैसा हवालामार्फत पुरवला गेला होता. जान मोहम्मद शेख हा हवाला रॅकेट पाहत होता आणि तो अंगडीयांच्या संपर्कात होता. स्लिपर सेलला पैसे देणे, दहशतवादी कृत्याकरता लागणा-या सामग्री करता पैसे देणे याकरता हा या पैशांचा वापर केला जायचा. यामुळे आता मुंबई आणि दिल्ली येथील अंगडीया दहशतवाद विरोधी पथकाच्या रडारवर आहेत. 6 दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंड जान शेखला मुंबईच्या सायनमधून अटक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टेरर फंडिगकरिता डी गॅंग अंगडिया अॅक्टिव्हेट केले गेले आहे. जान शेख याच्या मार्फत पैशांचे व्यवहार केले जात होते. मुंबईतील गर्दीच्या आणि व्हीआयपी ठिकाणांची माहिती गोळा करण्याकरता माणसे कामाला लावली होती. दिल्ली ते मस्कट विमानाने आणि मस्कट ते पाकिस्तान जहाजाने दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी नेण्याची सोय अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ अनिसने केली होती. ISI आणि पाक सैन्य यांच्या सहकार्याने दहशतवाद्यांना ट्रेनिंगची सोय केली. तसेच दहशतवाद्यांची दिल्ली ते पाकिस्तान आणि पाकिस्तान ते दिल्ली जाण्याची व्यवस्था केली होती. जान शेख मुंबई ते दिल्ली गेला जात होता. ट्रेनने जान दिल्लीला जात असे. जान याच्यासाठी रेल्वे तिकिट बूक करणाऱ्याला ATS ने ताब्यात घेतले आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या