मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सख्या भावावर कुऱ्हाडीचा घाव, कुटुंब उद्ध्वस्त, बारामती हादरलं

सख्या भावावर कुऱ्हाडीचा घाव, कुटुंब उद्ध्वस्त, बारामती हादरलं

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

बारामतीत एका सख्या लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरला आहे.

पुणे, 13 ऑगस्ट : 'माय म्हणे माले पोऱ्या झाया, भाऊ म्हणे माले दुश्मन झाया', अशी अहिराणी बोलीभाषेतील प्रसिद्ध म्हण आहे. या म्हणीचा अर्थ असा की, घरात बाळ जन्माला आल्यानंतर आई मला मुलगा झाला, असं आनंदाने म्हणते. पण त्या बाळाचा मोठा भाऊ माझ्या विरोधात शत्रू जन्माला आला, असं म्हणतो. या म्हणीप्रमाणेच पुण्याच्या बारामती तालुक्यात घटना घडली आहे. बारामतीत एका सख्या लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरला आहे. बारामती तालुक्यातील मोढवे येथे संबंधित घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची कुऱ्हाडीने हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने तपास करत आरोपी लहान भावाला अटक केली आहे. तायप्पा सोमा मोटे (वय 60) असे मृत भावाचे नाव आहे. दोन्ही सख्या भावांमध्ये अनेक वर्षांपासून जमिनीचा वाद होता. या विषयावरुन त्यांच्यावर वारंवार भांडण व्हायचं. याच वादातून तायप्पा मोटे या मोठ्या भावाने दोन दिवसांपूर्वी रस्त्यात लाकडी ओंडका टाकून रस्ता बंद केला होता. (ब्रेकअप झाल्याने नाराज झालेल्या प्रियकराने महिलेचे कपडे काढले अन्.. गुन्हा दाखल) या किरकोळ वादातून शुक्रवारी रात्री दोन्ही कुटुंबात मारामारी झाली. भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले. एकमेकांचा खून करण्यासाठी दोघांनी घरातून हत्यारे आणली. यादरम्यान रामा मोटे याने तायप्पा यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अरोपी रामा मोटे जखमी झाल्याने रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटना नेमकी काय घडली ते समजून घेतलं. त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला. पोलीस या प्रकरणी सध्या तपास करत आहेत.
First published:

Tags: Crime, Murder

पुढील बातम्या