मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

YouTube वर शिकला ऑनलाईन फ्रॉड; सासूच्याच अकाउंटमधून उडवले लाखो रुपये

YouTube वर शिकला ऑनलाईन फ्रॉड; सासूच्याच अकाउंटमधून उडवले लाखो रुपये

अनेकदा सासू जावयालाच एटीएम कार्ड देऊन पैसे काढण्यास सांगायची. याचाच फायदा घेत, अमितने आपल्या मित्रासोबत प्लॅन करुन सासूच्या अकाउंटमधून पैसे काढण्याचं ठरवलं.

अनेकदा सासू जावयालाच एटीएम कार्ड देऊन पैसे काढण्यास सांगायची. याचाच फायदा घेत, अमितने आपल्या मित्रासोबत प्लॅन करुन सासूच्या अकाउंटमधून पैसे काढण्याचं ठरवलं.

अनेकदा सासू जावयालाच एटीएम कार्ड देऊन पैसे काढण्यास सांगायची. याचाच फायदा घेत, अमितने आपल्या मित्रासोबत प्लॅन करुन सासूच्या अकाउंटमधून पैसे काढण्याचं ठरवलं.

  • Published by:  Karishma

वाराणसी, 14 फेब्रुवारी : कोरोना काळात ऑनलाईन ट्रान्झेक्शन जितक्या प्रमाणात वाढलं आहे. त्या वेगाने ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणातही मोठ्या संख्येत वाढ झाली आहे. कॅशलेस ट्रान्झेक्शनच्या काळात अनेकांची मोठी फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. अशाच प्रकारची एक घटना वाराणसमध्ये (Varanasi) पाहायला मिळाली आहे. एका जावयाने आपल्या मजेसाठी सासूच्याच अकाउंटमधून लाखो रुपये उडवले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अकाउंटमधून पैसे काढण्यासाठीची पद्धत तो यूट्यूबवर शिकला आणि त्याप्रमाणे फ्रॉड केला.

सुनिता देवी यांनी त्यांच्या अकाउंटमधून जवळपास सहा लाख रुपये गायब झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, चोरी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो तक्रारदार महिलेचा जावई अमित कुमार असल्याचं समजलं. हा फ्रॉड त्याने पेटीएमद्वारे केला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अमितने सांगितलं की, त्याच लग्न अजय कुमार आणि सुनिता देवी यांची मुलगी नेहा हिच्याशी झालं होतं. नेहाचा कोणी भाऊ नसल्याने, अमितही लग्नानंतर त्यांच्याकडेच राहू लागला.

सुनिता देवी यांचे पती बीएसएनएलमध्ये कार्यरत होते. रिटायरमेंटनंतर त्यांनी मिळालेले संपूर्ण पैसे एका बँक अकाउंटमध्ये जमा केले होते. बँकेची कामं करण्यासाठी जावई अमितच सासूला घेऊन जात असे. अनेकदा सासू जावयालाच एटीएम कार्ड देऊन पैसे काढण्यास सांगायची. याचाच फायदा घेत, अमितने आपल्या मित्रासोबत प्लॅन करुन सासूच्या अकाउंटमधून पैसे काढण्याचं ठरवलं.

(वाचा - इंटरनेट वापरात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर; रिपोर्टमधून महत्त्वाची बाब समोर)

त्यानंतर अमितने त्याचा मित्र सूरजच्या मोबाईल नंबरवरून पेटीएम अकाउंट बनवलं आणि सासूच्या अकाउंटचा वापर केला. ओटीपी पीन आल्यानंतर काही कारणाने सासूचा फोन घेऊन ओटीपी मिळवायचा आणि नंतर मेसेज डिलीट करायचा. असं करत करत अमितने सूरजसह मिळून सासूच्या अकाउंटमधून तब्बल 5,90,389 रुपये काढले.

त्यानंतर काही दिवसांनी सासू एटीएममध्ये पोहचली आणि तिला बँकेतून इतकी मोठी रक्कम उडाल्याचं समजलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. सायबर क्राईम टीमने या संपूर्ण घटनेचा शोध घेत खुलासा केला असून सध्या दोन्ही आरोपींना जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे.

First published:

Tags: Online fraud, Paytm, Youtube