हैदराबाद, 20 डिसेंबर: घराशेजारी राहणाऱ्या दोन जणांनी एका विवाहित महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यावर सामूहिक बलात्कार (married woman gang raped by neighbours) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम आरोपींनी पीडित महिलेच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती तिच्या घरच्यांना देण्याची भीती दाखवून (threat to exposed immoral relationship) तिच्यावर अत्याचार केला आहे. आरोपींनी पीडित महिलेला एका निर्जन स्थळी घेऊन जात तिला नरक यातना दिल्या आहेत. अत्याचारानंतर पीडित महिलेनं आपल्या प्रियकरासोबत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पीडित महिला शुद्धीवर येताच या घटनेला वाचा फुटली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पीडितेनं हा धक्कादायक खुलासा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना तेलंगणाची राजधानी हैदराबाद शहरातील एस आर नगर परिसरात घडली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा- नवऱ्याशी भांडून माहेरी आली तरुणी; तिसऱ्याशी अफेअरच्या संशयाने प्रियकराकडून हत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एक बांधकाम कामगार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचं तिच्या एका सहकाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. 13 डिसेंबर रोजी ती आपल्या प्रियकराला भेटायला चालली होती. यावेळी घराशेजारी राहणाऱ्या दोन जणांनी तिला आडवलं आणि प्रेमसंबंधाची माहिती तुझ्या घरच्यांना सांगू अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला एका निर्जन ठिकाणी घेऊन जात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. हेही वाचा- डायपरमध्ये लपवले ड्रग्स; थर्टी फस्ट पार्टीच्या तयारीत असलेली एअर होस्टेस अटकेत या धक्कादायक प्रकारानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी पीडित महिलेनं आपल्या प्रियकरासोबत किटकनाशकाचं औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण बेशुद्ध होण्यापूर्वी प्रियकराने याची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी दाखल होत, दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी उपचार केल्यानंतर, 17 डिसेंबर रोजी पीडित महिलेला शुद्ध आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिची चौकशी केली असता, तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.