नवी दिल्ली 24 जुलै : रेफ्रिजरेटरमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलताना मोठा खुलासा झाला आहे. ही घटना दिल्लीमधील असून पोलिसांनी २ आरोपींना अटकही केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार लाखांची रोकड आणि लाखोंचे दागिने जप्त केले आहेत. हा खुनाचा गुन्हा शुक्रवारचा असून त्याची सीलमपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. वडिलांनी दिलं केकचं आश्वासन, पण पैसे न दिल्याच्या रागातून पदवीच्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सीलमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरातील फ्रीजमध्ये मृतदेह सापडला. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. गुप्तचर माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या स्कॅनिंगच्या आधारे पोलिसांना या प्रकरणातील मारेकऱ्यांचा सुगावा लागला, त्यानंतर त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. दोघांना अटक करण्यात यश आले आहे, त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्यातील आपली भूमिका मान्य केली आहे. या घटनेत दरोड्याचा हेतू उघड झाला आहे. मृताकडे मोठी रोकड आणि दागिने असल्याची माहिती आरोपींना होती. मृताच्या सख्ख्या भावाने हत्येचा कट रचला आणि मृताने ज्याला आपल्या मुलासमान मानले होते त्यानेच ही हत्या केली. नागपूर जिल्ह्यात 42 वर्षीय महिलेची आत्महत्या, सातव्या माळ्यावरुन घेतली उडी आबिद (55) आणि जाहिद (25) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 4 लाखांची रोकड आणि लाखोंचे दागिने जप्त करण्यात आले असून उर्वरित रक्कम जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुन्ह्यातील हत्यारे (हातोडा) आणि लुटमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्यांसारख्या वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.