नागपूर, 23 जुलै : नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. एका विधवा महिलेने सातव्या माळ्यावरुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेचे वय 42 होते. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जामठा (ता. हिंगणा) येथील संदेश सिटीमध्ये घडली. काय आहे संपूर्ण बातमी - नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्याती जामठा येथे एका महिलेने आत्महत्या केली आहे. शुभांगी गोयल (वय 42) असे मृत महिलेचे नाव आहे. हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जामठा येथील संदेश सिटीमध्ये शुक्रवारी रात्री साडेनऊ त्या 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेतला. मृत शुभांगी गोयल यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्या आपल्या दोन मुलींसोबत संदेश सिटीमधील स्टेर्लिंग टाईप ई-3 या इमारतीत सातव्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये राहत होत्या. शुभांगी या वजनमापे तपासणी करणाऱ्या एका खासगी एजन्सीमध्ये नोकरी करत होत्या. शुक्रवारी त्या कामावर गेल्या नव्हत्या. तर दिवसभर घरीच होत्या. तसेच संध्याकाळी त्यांनी स्वयंपाकही केला होता. हेही वाचा - VIDEO : अचानक बुलेरो आली, कारला धडकली, पाहता-पाहता फुटपाथवर चढली आणि मोठा गदारोळ, नागपुरात विचित्र अपघात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन्ही मुली बेडरुमध्ये होत्या. यावेळी त्या फ्लॅटच्या गॅलरीत आल्या आणि कुणाचेही लक्ष नसताना त्यांनी सातव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. तर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर आईचेही निधन झाल्याने दोन्ही मुली पोरक्या झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.