नवी दिल्ली 19 सप्टेंबर : स्वतःच्याच चार मुलींची विष देऊन हत्या (Father Kills 4 Daughters) करणाऱ्या आणि नंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) करणाऱ्या बापाचं बिंग अखेर फुटलं आहे. आरोपीनं दुसरं लग्न करण्यासाठी आपल्या चार मुलींचा जीव घेतला. या मुलींचे मामा देवारामनं पोलिसांना सांगितलं, की तीन महिन्यांआधी त्याची बहीण पप्पूचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाला. यानंतर आरोपी पुरखाराम आपल्या मेहुणीसोबत लग्न (Marriage) करण्याचा हट्ट करू लागला. यासाठी नकार दिल्यानं त्यानं आपल्या चारही मुलींना पाण्यातून विष देत त्यांचा जीव घेतला आणि नंतर स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. भारतातील रहस्यमयी ‘बर्म्युडा ट्रँगल’; इथे जाणारा व्यक्ती कधीच परत का येत नाही? बाडमेर जिल्ह्यातील शिव ठाणा क्षेत्रातील पोशाल नवपुरा गावात राहणाऱ्या पुरखारामचं दहा वर्षाआधी पप्पू नावाच्या महिलेसोबत लग्न झालं. त्यांना चार मुली होत्या. मात्र, याचवर्षी जून महिन्यात आरोपीच्या पत्नीचा कोरोनानं मृत्यू झाला. यामुळे आरोपी दुसरं लग्न करण्याच्या विचारात होता. तो आपल्या मेहुणीसोबतच लग्न करणार असल्याचा हट्ट करत होता. सासरकडचे लोक त्याला वारंवार समजावत होते, की मेहुणीचं लग्न दुसरीकडे ठरलं असल्यानं ती तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. अशात चार मुलांचा बाप असलेल्या माणसाला मुलगी कोण देणार असा सवाल त्याला होता. त्यामुळे, त्यानं आपल्या चारही मुलींचा जीव घेण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या मृत्यूनंतर पुरखारामच्या चारही मुली आपल्या मामाच्या घरी होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसाआधी आरोपी पुन्हा आपल्या सासरी गेला. तिथे जाऊन त्यानं पुन्हा लग्नासाठी हट्ट केला. सासरकडच्या लोकांनी त्याला समजावलं की दुसरीकडे तुझं लग्न लावून देईल. यानंतर तो शुक्रवारी सकाळी चारही मुलींना घेऊन आपल्या घरी आला. इथे त्यानं पाण्यात कीटकनाशक मिसळून ते आपल्या मुलींना पिण्यासाठी दिलं आणि त्यांची हत्या केली. यामुळे आपल्याला तुरुंगात जावं लागेल या भीतीनं त्यानंही विष प्राशन केलं आणि पाण्यात उडी घेतली. जगात केवळ दोनच ठिकाणी फुलतं हे दुर्मिळ फूल; किंमत ऐकून व्हाल थक्क, रंजक आहे कथा या व्यक्तीनं पाण्यातून विष पाजत आपल्या चारही मुलींना पाण्याच्या टाकीत ढकललं. यानंतर त्यानं स्वतःही विष पित पाण्यात उडी घेतली. मात्र, आसपासच्या नागरिकांनी त्याला उडी घेताना पाहिलं आणि पाणी कमी असल्यामुळे त्याला वाचवण्यात यश आलं. मात्र, त्याच्या चारही मुलींचा मृत्यू झाला. मुलींचा मामा देवाराम यानं दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी पुरखारामविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







